किनवट /प्रतिनिधी: विमुक्तजन शिक्षण प्रसारक मंडळ, किनवटचे संस्थापक, अध्यक्ष स्व. प्रा. इंद्रसिंगजी राठोड यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी 10.00 वाजता स्व. प्रा. इंद्रसिंगजी राठोड यांचे दोन्ही चिरंजीव ॲड सचिनजी राठोड (अध्यक्ष विमुक्तजन शिक्षण प्रसारक मंडळ, किनवट) व श्री प्रविणजी राठोड (नगरसेवक, न.प.किनवट) यांनी शेतातील समाधीस्थळी जाऊन विधीवत पुजन केले. संपूर्ण परिवारसह, नातेवाईक, मित्रमंडळी आणि संपूर्ण शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी असा मोठा परिवार आदरांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित होता. समाधीस्थळी वृक्षारोपन करण्यात आले.
त्यानंतर उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रूग्णांना वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.आर.लोंढे, डॉ. मनोज घडसिंग, डॉ. ढोले यांच्या उपस्थितीत फळे व बिस्किटे वाटप करण्यात आले. विमुक्तजन् शिक्षण प्रसारक मंडळा अतंर्गत चालणाऱ्या वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालय, सिंदखेड, सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, किनवट, रतनीबाई राठोड प्रा.शा.किनवट व इंदिरा गांधी माध्य. विद्यालय, गोकुंदा या शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला. किनवट येथील संथागार वृध्दाश्रमात अन्नदान करण्यात आले. प्रथम पुण्यतिथी निमित्य शाळांमध्ये सामान्यज्ञान स्पर्धा, चित्ररंगभरण अशा विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. दुपारी ॲड.सचिनजी राठोड यांचे राहते घरी स्व. प्रा. इंद्रसिंगजी राठोड साहेबांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांच्या पावनस्मृतीस विनम्र आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी श्री मोहन जाधव (अकोला), श्री परशुराम चव्हाण (नांदेड), श्री प्रभुसिंग नाईक, श्री शाम नाईक (हिवळणी), श्री सुभाष जाधव (तहसीलदार, कारंजा), प्रा.पांडूरंग पवार, ॲड. शंकर राठोड, श्री अखिल खान, श्री साजीद खान (मा.नगराध्यक्ष), प्रा.सुनिल व्यवहारे, प्रा.शिंदे, प्रा. पंजाब शेरे, गिरीश नेम्मानीवार, श्री प्रदिप वाकोडीकर, श्री प्रमोद पोहरकर, श्री गोकुळ भवरे, श्री विजय जोशी आदि पत्रकारासह मान्यवर उपस्थित होते.