किनवट ( प्रतिनिधी) तल्लारी तालुका किनवट येथे गावालगत असलेल्या नाल्यावरील कमी उंचीच्या पुलामुळे पुराचे पाणी पुलावरून वाहते त्यामुळे तेथील नागरिकांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी जीव मोठी धरून ये जा करावी लागत आहे. गावकऱ्याची अडचण लक्षात घेऊन नाल्यावरील पुलाची उंची वाढवावी अशी माहिती येथील ग्रामस्थांनी केलेली आहे.
तल्हारी हे गाव किनवट तालुक्यातील व नांदेड जिल्ह्यातील टोकाला बसलेले गाव आहे. या गावात 800 लोकसंख्या असून सर्व गाव आदिवासी बहुल आहे. इस्लापूर ते शिवनी या मुख्य रस्त्या ला जोडून त्या गावाला जाणारा एकच मार्ग आहे. गावाच्या पाचशे मीटर अंतरावर एक नाला वाहतो. या नाल्याला सध्या एक महिन्यापासून अतिवृष्टी होत असल्यामुळे सतत पूर येत आहे. या पुराचे पाणी पुलावरून जाते. येथील नागरिकांना शेतीला जाण्यासाठी तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच शिवणी येथे बाजार ला जाण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणाला जाण्यासाठी तसेच आजारी व्यक्तीला दवाखान्याला जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. पण पुलावरून पाणी जात असल्यामुळे या गावचा संपर्क तुटतो, त्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. अनेक आजारी व्यक्तींना पूर्व ओसरेपर्यंत तडफडत राहावे लागते. त्यामुळे तल्हारी येथील नागरिकाची ही अडचण लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी व शासकीय यंत्रणेने तात्काळ या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
तल्हारी गावाजवळील पुलाची उंची वाढवावी परिसरात ग्रामस्थांची मागणी
337 Views