किनवट प्रतिनिधी ..
केंद्रातील मोदी सरकारच्या या हुकूमशाही कार्यपद्धतीचा निषेध म्हणून आज दिनांक 26 जुलै 2022 रोजी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर शांततापूर्ण सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय विविध यंत्रणेचा दुरुपयोग करून काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा माननीय सोनियाजी गांधी यांना ईडी कार्यालयात वारंवार बोलावून विनाकारण त्रास देण्याच्या मानसिक ते विरुद्ध हे काँग्रेसचे शांततापूर्ण सत्याग्रहाची आंदोलन यशस्वीपणे संपन्न झाले आहे. काँग्रेस कमिटीची तालुकाध्यक्ष माननीय सूर्यकांत जी रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आंदोलनात खालील पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला त्यात प्रामुख्याने व्यंकटरावजी नेमानिवार, शेख चांद रतन जी, माजी उपनगराध्यक्ष किनवट, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गिरीश नेमानिवार, वसंत राठोड जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी, सय्यद अनवर, इम्रान खान इशा खान, बिलाल बडगुजर, प्रीती मुनेश्वर, भरणे जयश्री, डॉक्टर तोफिक खान, अभय महाजन, माधव खेडकर, विनोद पवार, संजय कोतुरवार आदीं पदाधिकाऱ्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
मोदी सरकारच्या विरोधातील शांततापूर्ण सत्याग्रहाचे आंदोलन संपन्न.
285 Views