KINWATTODAYSNEWS

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, करमाळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान;पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी केले संघाचे कौतुक

करमाळा, सोलापूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाच्या करमाळा तालुका शाखेच्या वतीने १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा शनिवार दि.२३ जुलै, २०२२ रोजी पंचायत समिती सभागृह, करमाळा, जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आला होता.
सदर सन्मान सोहळा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या प्रेरणेने, सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा आशाताई चांदणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी मनोज राऊत तर प्रमुख अतिथी म्हणून करमाळा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, ॲड. बाबुराव हिरडे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी व्ही एन माने, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा आशाताई चांदणे, भारत महाविद्यालयाचे प्राचार्य दहिभाते, दिगंबर बागल विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील, ग्लोबल विदयालयाचे मुख्याध्यापक महेश निकत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले व करमाळा तालुक्यातील जास्तीत जास्त शाळांमधील गुणवंतांचा सत्कार पुढील वर्षापासून या पत्रकार संघाने करावा अशी अपेक्षा व्यक्त करुन प्रसार माध्यमांनी नकारात्मक बाबी मांडण्याबरोबर सकारात्मक बाबी मांडून बदल घडवून आणला पाहिजे. असे प्रतिपादन केले.
गणेश करे पाटील यांनी करमाळा तालुक्यातील विद्यार्थी स्पर्धा परिक्षेत कमी पडत असून त्याकडे शिक्षकांनी लक्ष देऊन जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्ता यादीत आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन केले. ॲड. बाबुराव हिरडे यांनी विद्यार्थ्यांवर संस्कार महत्त्वाचे आहेत. शिक्षकांबरोबर पालकांनीही आपल्या मुलांकडे लक्ष दिले पाहिजे असे सांगितले. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा आशाताई चांदणे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय मनोगतात गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी पालक आपल्या पाल्यावर अपेक्षा लादतात, तसं न करता त्यांनी पाल्याला आवड, संधी, क्षमता हे तीन गुण पाहून करीयर करण्याची संधी दयावी असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे करमाळा तालुका अध्यक्ष बाळासाहेब भिसे, सूत्रसंचालन सचिन नवले तर आभार तालुका उपाध्यक्ष दादासाहेब शिंदे यांनी मानले.
यावेळी भारत हायस्कूल जेऊर, दिगंबर बागल विद्यालय कुंभेज, दिगंबर बागल विद्यालय सावडी, नामदेवराव जगताप विदयालय झरे, त्रिमूर्ती विद्यालय टाकळी, श्री. छत्रपती शिवाजी हायस्कुल कोर्टी, उत्तरेश्वर हायस्कूल केम, न्यु इंग्लिश स्कुल घोटी, साडे वांगी, करमाळा ग्लोबल सायन्स आदी शाळेतील प्रथम आलेल्या तीन विद्यार्थ्यांचा येथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या उपाध्यक्षा विजया कर्णवर, जिल्हा सचिव प्रमिला जाधव, जेऊर शहराध्यक्ष आबासाहेब झिंजाडे, तालुका उपाध्यक्ष दादासाहेब शिंदे, तालुका संपर्क प्रमुख प्रमोद खराडे, सदस्य माधुरीताई कुंभार, सदस्य संजय चांदणे, सदस्य श्रीमंत दिवटे धनंजय पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

45 Views
बातमी शेअर करा