KINWATTODAYSNEWS

उगवते युवा नेतृत्व सय्यद जाकीर हुसैन उतरणार निवडणुकीच्या रिंगणात!* *राजकीय कारकिर्दीची सुरुवात करण्यास इच्छुक; वाढता जनसंपर्क

आर्णी: येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे, सामान्य जनतेच्या हाकेला धावून जाणारे उगवते युवा नेतृत्व तथा पत्रकार झाकिर हुसैन आगामी नगर परिषद निवडणुकीत उतरणार असल्याची माहिती आहे. नेमक्या कोणत्या पक्षाकडून उतरणार, हे मात्र गुलदस्त्यात आहे. गावातील युवकांना एकत्रित करून त्यांनी अनेक संघटनेची स्थापना केली. त्या माध्यमातून ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, रुग्णसेवा, रक्तदान शिबीर, लोकांना शासकीय कामात मदत, गोरगरिबांना योजनेचा लाभ, निवेदनाचे हत्यार उपसून त्यांनी विधायक कामे आजवर केली आहेत.

माजी आमदार ख्वाजा बेग तथा माजी नगर अध्यक्ष अरीज बेग यांच्या राजकीय करिअर व त्यांच्या पावलावर पाऊल टाकत झाकिर हुसैन नवीन राजकीय कारकीर्द उज्वल करण्याची तयारी करीत आहेत. झाकिर हुसैन यांनी जवळपास नगर परिषद निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी केली आहे. झाकिर हुसैन यांचा जनसंपर्क वाढला आहे. वाढत्या जनसंपर्कामुळे विरोधकांनी चांगलीच धास्ती घेतल्याची चर्चा शहरात रंगत आहे. आगामी निवडणुक लक्षात घेता घरो घरी जाऊन लोकांच्या अडचणी व समस्या जाणून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न करणे यावर अधिक भर देताना ते दिसत आहे. अनेक राजकीय कार्यकर्त्यांशी असलेले जवळीकतेचे संबंध, नातेसंबंध, अनेकांशी व्यक्तिगत संबंध या कारणाने ते आगामी काळात त्यांच्या वार्डात अडचणीचे ठरू शकतील,अशी चर्चा आहे.

सोशल मीडियावर देखील ते जनसंपर्क वाढवताना दिसत आहे. हल्ली सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम ठरताना दिसते. कमी वेळात जास्तीत जास्त व्यक्तींच्या संपर्कात येण्याकरिता समाजमाध्यमांचा वापर वाढला आहे. आपल्या कार्याचा लेखाजोखा नियमित अपडेट केले जात असल्याने शेकडो लोकांपर्यंत ते पोहोचत आहे. जनतेचा उमेदवार म्हणून मी जनतेच्या दरबारात जाणार आहे. आणि सुज्ञ जनता माझ्या पाठीशी उभी राहील,असा माझा ठाम विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.

आर्णी नगर परिषदेचे 9 वार्ड होते आता संख्या वाढवून 11 करण्यात आली आहे त्यामुळे इच्छुक तयारीला लागले असले तरी नगर अध्यक्षचे आरक्षण जाहीर झाल्यावरच खऱ्या अर्थाने रणधुमाळी सुरू होईल.

(जनतेचा उमेदवार म्हणून मी जनतेच्या दरबारात जाणार आहे. आणि सुज्ञ जनता माझ्या पाठीशी उभी राहील,असा माझा ठाम विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.)

झाकिर हुसैन

48 Views
बातमी शेअर करा