नांदेड/प्रतिनिधी
मागासवर्गीय समाजाचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणारा निर्णय मागे घेण्यात यावा, मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण मिळवून देण्यात यावे याबाबत माननीय जिल्हाधिकारी नांदेड मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या वतीने निवेदन देण्यात आले.
पीपल्स रिपब्लिकन पार्टी नांदेड च्या वतीने निवेदनात असे म्हटले आहे की, दिनांक 7 मे 2021 रोजी महाराष्ट्र शासनाचे मागासवर्गीय समाजाचे कर्मचारी,अधिकारी यांना पदोन्नतीतील मिळणारे ते 30 टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो निर्णय मागासवर्गीय समाजावर अन्याय करणारा असल्याने तो तात्काळ मागे घेण्यात यावा व पूर्ववत आरक्षण सुरू ठेवावे. तसेच गरीब मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण मिळवून देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करून लवकरात लवकर न्याय मिळून अशी विनंती करण्यात आली आहे. अन्यथा पी आर पी चे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे सर, कार्यअध्यक्ष जयदीप कवाडे, हंगामी प्रदेशाध्यक्ष चरणदास इंगोले, यांचे आदेशा वरून संपूर्ण राज्यभर आंदोलन केले जाईल अशा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, राज्य उपाध्यक्ष बापूराव गजभारे, जिल्हा उपाध्यक्ष माधवराव गोडबोले, जिल्हा संघटक सतीश पांडवे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष साहेबराव सोनकांबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मागासवर्गीय समाजाचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणारा निर्णय मागे घेण्यात यावा अन्यथा राज्यभर आंदोलन- पीपल्स रिपब्लिकन पार्टी
183 Views