KINWATTODAYSNEWS

रात्रीच्या वेळी मोकाट जनावरांचा प्रमुख रस्त्यावर मुक्काम! वाहनधारकांना नाहक त्रास

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.19. जिल्यातील सर्वच तालुक्यात रात्रीच्या वेळी आता मोकाट जनावरांचा निवारा प्रमुख रस्त्यावरील प्रमुख चौकात मुक्काम वाढला असून एका एका चौकात दहा ते वीस मोकाट जनावरे त्याच्यामध्ये गाई बैल वासरे असे असून ते रात्री प्रमुख रस्त्यावर बसत असल्यामुळे वाहनधारकांना त्रास होत आहे.

रात्रीच्या वेळी जरी शहरात प्रमुख रस्त्यावर रहदारी नसली तरी अधून मधून भरधाव वेगाने दुचाकी,चारचाकी,व ऑटो हे धावतच असतात.रेल्वे स्थानक या प्रमुख रस्त्यावर वाहनांची वर्दळ अधून मधून असतेच! रेल्वे गाडीचा टाईम झाल्यामुळे वाहनधारक अगदी भरधाव वेगाने येतात.पण भर चौकात मोकाट जनावरांनी ठिय्या मांडून बसल्यामुळे त्यांना चुकवण्याच्या नादात किरकोळ अपघातही झाले.ही मोकाट जनावरे देवाची आहे असे सांगण्यात आले.

त्यामुळे श्रद्धेने जरी बघितले तरी पण त्यांचा बंदोबस्त एका विशिष्ट जागेमध्ये असायला पाहिजे या गोष्टींमध्ये जिल्यातील नगरपालिका आज परेंत नापास राहिली आहे.

आम्ही देवाचे जनावरे म्हणून नागरिकांना अपघातास निमंत्रण देत आहे.सदरील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी जनतेतून जोर धरीत आहे.

74 Views
बातमी शेअर करा