अंधारात चिखलमय रस्त्याने करावी लागतेय वाटचाल
किनवट/ता.प्रतिनिधी:-
किनवट येथील हमाल कॉलनी व मथुरानगर च्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. येथील नागरीकांना अंधारात गुडघाभर चिखलामध्ये ये- जा करावे लागत आहे.
गेल्याच वर्षी २०२१ मध्ये हमाल कॉलनीचे नागरिक व दिलदार गाडी हमाल सहकारी संस्था संघठनेच्या वतीने अमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते. परंतु नगरअध्यक्ष व नगर परीषद प्रशासनाने लेखी आश्वासन देऊन उपोषण सोडवले पण प्रत्यक्षात अमलबजावणी झाली नाही. खोटे आश्वासनाने तेथील नागरीक नरकयातना भोगत आहेत तरी या गंभीर प्रश्नाकडे तात्काळ लक्ष देऊन समस्याचे समाधान करावे अन्यथा तेथील नागरीकाच्या वतीने पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
फक्त मताची झोळी मागण्यांसाठीच या कॉलोनीत नेते येतात नंतर कोणीही इकडे ढुंकूनही पाहत नाहीत.अशी प्रतिक्रिया येथील महिला तर्फे येत आहेत.
हमाल कॉलनी,मथुरानगरात चिखलाचे साम्राज्य 25 वर्षांपासून साधा रस्ताही नाही.
234 Views