किनवट/प्रतिनिधी: किनवट तालुक्यातील अतीवृस्टी शेतकऱ्याच्या पिंकाचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50.000 /-रुपये आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री याना निवेदनाद्वारे करण्यात आली.
मागील आठवडा भरापासून तालुक्यामध्ये व परिसरा मध्ये व चालू असंलेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या पंधरा दिवसापासून सूर्य दर्शन झाले नाही. सततच्या पावसामुळे परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके नष्ट होण्याच्या मार्गवार झाले आहेत. त्या मुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणी संकट निर्माण झाले आहेत कोसळलेल्या नैसर्गिक संकटा मुळे आर्थिक नुकसान होऊन शेतकर्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे तरी मा. तहसीलदार साहेबना विनंती आहे कि अतिवृस्टी ग्रस्त शेतकऱयाच्या पिंकाचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50000/- हजार रुपयांची तात्काळ मदत द्यावी..अशी मागणी सचिन पाटील कदम(संभाजी ब्रिगेड )ता.अध्यक्ष शिवा पाटील पवार,विधानसभा अध्यक्ष.सुमित माने पाटील ,ता.उपध्यक्ष आकाश इंगोले पाटील
ता. प्रसिद्धी प्रमुख नरेश संगनेनिवार शहर उपध्यक्ष ऋषिकेश जामगे उमरी सर्कल प्रमुख
निवेदनाच्या प्रतिलिपीत
1) मा. उपविभागीय अधिकारी साहेब ; उपविभाग कार्यलय किनवट..
2) मा. कृषी अधिकारी साहेब ;कृषी कार्यलय किनवट
3)मा. पोलीस निरीक्षक साहेब ;पोलीस स्टेशन किनवट
यांना देण्यात आले आहेत.
अतीवृस्टी शेतकऱ्याच्या पिंकाचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50.000 /-रुपये आर्थिक मदत देण्यात यावी-संभाजी ब्रिगेड
185 Views