*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.18.मुखेड शहरातील इरफान सौदागर हे कोरोना आणि ओमायक्रोन या काळामध्ये सायकलने १४०० किलो मिटर प्रवास करून राजस्थानातील अजमेर येथील ख्वाजा गरिबांन नवाज रहे.यांच्या दर्गात कोरोना ओमायक्रोन कमी होण्यासाठी दर्शन व प्रार्थना करण्यासाठी प्रवास केल्याने सन २०२२ च्या इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुवर्ण अक्षरात नाव नोदवील्याने मा. जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल बुक, पेन, आयडी कार्ड देऊन सन्मान करण्यात आले.
इरफान सौदागर उर्फ हुसेन साब इब्राहिम निचलकर हे मजुरी करणारे व्यक्ती असून स्वताच्या खर्चावर समाज जनजागृती कोरोना ओमायक्रोन सारख्या संसर्गजन्य रोगावर मात करण्यासाठी राजस्थानातील अजमेर येथील हजरत ख्वाजा गरिबान नवाज रहे.दर्गा यांच्याकडे महाराष्ट्र,मध्य प्रदेश राजस्थानातुन १४०० किलो मीटर प्रवास करुन संसर्गजन्य आजारावर बचाव चा संदेश जनजागृती करत,लस घेण्याचा प्रचार,मास्क लावण्याचा प्रचार, सोशल डिस्टन्स चा प्रचार व्यसनमुक्त भारतचा प्रचार सायकल वर दोन्ही साईडने पाटी लाऊन केल्याने भारत सरकार तर्फे इरफान सौदागर यांचे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवीण्यात आले. इरफान सौदागर यांना दोन आपत्य आहेत.ते बी.ए.पास असुन मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. महाराष्ट्र सरकार,मध्यप्रदेश, राजस्थान व केंद्र सरकारने नौकरी व मानधन देऊन गौरविण्यात यावे अशी मुखेडकरांची भावना आहे.