KINWATTODAYSNEWS

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची केली पाहणी.

किनवट : तालुक्यात सतत ६ दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे बऱ्याच ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष पत्रकार आशिष शेळके यांनी गोकुंदा ग्रामपंचायत चे निरीक्षण केल्यानंतर त्यांना बऱ्याच ठिकाणी घरांची पडझड झालेल्या चे निरीक्षणास आले.
आशिष शेळके यांनी सांगितले की, गोकुंदा ग्रामपंचायत मधील वार्ड क्रमांक १ मध्ये व वार्ड क्रमांक ३ मध्ये काही घरे पडली तर काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत, तर वार्ड क्रमांक ४ व ५ मध्ये सुद्धा काही घरांच्या भिंती पडल्या आहेत. त्या घरांची पाहणी केल्यानंतर मी गोकुंदा ग्रामपंचायत चे ग्रामसेवक मावळे यांना यांबाबत माहिती दिली व तेथील पंचनामा करून त्यांना लवकरात लवकर सहकार्य करावे असे सांगितले. ग्रामसेवक मावळे यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर नुकसान झालेल्यांना लवकरात लवकर सहकार्य करु अशे आश्र्वासन दिले.
पुढे बोलताना शेळके म्हणाले की, गोकुंदा ग्रामपंचायत मधील वार्ड क्रमांक १ ते वार्ड क्रमांक ६ मधील कुठल्या नागरीकांच्या घराची पडझड झाली असेल, किंवा एखादी भिंत ढासळुन घराचे काही नुकसान झाले असेल, तर त्यांनी तातडीने ज्यांच्या नावा वर घर आहे त्यांचे आधारकार्ड, बँक पासबुक व नमुना नंबर ८ यांचे झेरॉक्स प्रत आणि नुकसान झालेल्या घराचा फोटो हे गोकुंदा ग्रामपंचायत मध्ये जमा करावे, नुकसान झालेल्यांना ग्रामपंचायत मधुन अर्थिक सहकार्य मिळेल, जर ग्रामपंचायत मधुन सहकार्य मिळत नसेल तर त्या नागरिकांनी मला माझ्या ९७६३१२९७९६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आशिष शेळके यांनी सांगितले.

83 Views
बातमी शेअर करा