किनवट ( प्रतिनिधी) किनवट तालुक्यात मागे तब्बल चार दिवस झालेल्या पावसामुळे व पैनगंगा नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या भागातील खरीप पिके पाण्याखाली गेले आहेत. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान मिळावे म्हणून पिक पाहणी सर्वे मोजे पिंपरी येथे दिनांक 15 जुलै रोजी करण्यात आला.
मौजे पिंपरी हे गाव पैनगंगा नदीच्या काठावर बसले आहे. येथील शेतकऱ्याच्या जमिनी नदीलगत असल्यामुळे नुकत्याच झालेल्या संततधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर येऊन शेतकऱ्याच्या पिकात पुराचे पाणी घुसून पिके हातची गेले आहेत. या शेतकऱ्यावर दुबार पेरणीची संकट ओडवले आहे. बाधित शेतकऱ्याला शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रशासनाच्या वतीने पिक पाहणी सर्वे करण्यात आला. हा सर्वे तलाठी बोंतवार, ग्रामसेवक मोरे यांनी केला. व तहसील प्रशासनास अहवाल पाठविला. यावेळी सरपंच गिरजाबाई सुदाम तोरकड, उपसरपंच सुलोचना ज्ञानेश्वर नागरगोजे, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर तोडकर, राजू सोनकांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष संजय गुट्टे, संदीप सोनकांबळे, भीमराव नागरगोजे, श्रीरंग नागरगोजे, सुदर्शन केंद्रे, बळीराम बदने, अंबादास केंद्रे, ज्ञानेश्वर नागरगोजे, दत्ता गुट्टे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
पावसामुळे व पैनगंगा नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान; पिंपरी येथे शासनाकडून सर्वे.
381 Views