KINWATTODAYSNEWS

बिट जमादार शबीर शेख यांच्या सतर्कतेमुळे 70 वर्षीय महिलेचा वाचला जिव

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.15.जिल्यातील नायगांव तालुक्या मधील कुंटूर पोलिस ठाण्यात हद्दीत असलेले राहेर हे गाव गोदावरी नदी काठचे गाव आहे सध्या पाऊस पाण्याची परिस्थिती पाहता कुंटूर पोलीस स्टेशन साहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांनी सर्व जनतेस पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा ईशारा देण्यात आला होता त्याच अनुषंगाने सर्व बीट जमादाराना त्या त्या गावात राहायला सांगण्यात आले मागच्या पाच सहा दिवसापासून पाऊस चालू असल्याने महसूल व पोलीस विभाग सतर्क असून नदी नाले व ज्या ज्या ठिकाणी गंभीर परिस्थिती उदभवण्याची शक्यता आहे त्या त्या ठिकाणी पोलिसांची गस्त आहे. राहेर परिसरातून गोदावरी नदी वाहते.आणि कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी कुंटूर पोलीस ठाण्याचे बिट जमादार शब्बीर शेख सेवक गजानन टोकालकरी यास सोबत घेवून फेरफटका करत असता एक वयोवृद्ध महिला नदी भरुन वाहणाऱ्या नदी पात्राच्या जवळ जातांना दिसली.एवढ्या पावसात आणि गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवर वाहत असताना एक वयोवृद्ध महिला नदी पात्राच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आल्याने शब्बीर शेख यांच्या डोक्यात शंका आली.त्यामुळे त्यांनी तत्काळ धाव घेऊन त्या वयोवृद्ध महिलेची विचारपूस करत असताना ति महिला आत्महत्या करण्याच्या विचाराने अली होती.

आई वडील म्हणजे आपल्याला जग दाखवणारे माय बाप आई म्हंटल्यावर 9 महिने पोटात ठेवून जग दाखलवणारी माता
लहानाच मोठ केल्यानंतर काम धंद्याला लागलेल्या मुलांना आई वडीलांची संपत्ती हवी असते पण आई वडील माञ नको असतात.

त्यामुळे वयोवृद्ध आई वडीलांना वाऱ्यावर सोडल्या जाते.असाच प्रकार दि 14 जून रोजी गुरुवारी सकाळी राहेर येथे आत्महत्या करण्यासाठी आलेल्या ७० वर्षीय महिला रतनबाई गोविंद हजपवाड वय 70 वर्ष रा.पाळा ता मुखेड येथील असून त्या महिलेचा जीव वाचवल्यानंतर सर्वञ जनते मधून हळहळ व्यक्त केले जात आहे.

कुंटूर पोलिसांनी आत्मीयता दाखवत याबाबत विचारपुस केली असता भयंकर वास्तव समोर आले.सदरची ७० वर्षीय वयोवृद्ध महिला ही मुखेड तालुक्यातील असून.मुलगा आणि सुनेने मालमत्ता नावावर करुन घेतल्यानंतर खाण्यापिण्याची अबाळ सुरु झाली. त्यामुळे ती महिला नरसी येथे आपल्या मुलीकडे राहू लागली पण खर्चासाठी एकही रुपया मुलगा देत नसल्याने अक्षरशः जगण्याला वैतागून ७० वर्षीय महिला गुरुवारी राहेर येथे आत्महत्या करण्यासाठी आल्या महिलेचा जीव वाचवण्यात आला ह्या सर्व घटनेवरून कुंटूर पोलीस स्टेशनचे बिट जमादार शब्बीर शेख सेवक गजानन टोकालकरी यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

50 Views
बातमी शेअर करा