किनवट/प्रतिनिधी
22 मार्च 2020 पासुन लाँकडाउन लागल्याने शाळा बंद झाल्या पण राज्यात सरकार होते पण या सरकारला पुरोगामी महाराष्ट्रातील शासकीय व अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील सुमारे साडेचार लाख विध्यार्थी ना पोषण आहार देण्याचा विसर पडला ते पोषण आहार त्वरीत द्या अशी मागणी प्रकाश गेडाम, प्रदेश सरचिटणीस, भाजपा STM, महाराष्ट्र प्रदेश यानी मा.मुख्यमंत्री, म.रा.यांचे कडे काय ली आहे
महाराष्ट्रात 556 शासकीय आश्रम शाळा आहेत यात 2 लाख विध्यार्थी आहेत. तर 550 अनुदानित आश्रम शाळा आहेत यात अडीच लाख आदिवासी विध्यार्थी शिक्षण घेत आहेत हे सर्व आदिवासी विद्यार्थी राज्य सरकारच्या चुकीच्या व लेटलतीपशाईच्या कर्माची फळे भोगत आहेत.
16 मार्च 2020.पुर्वी मिळालेले गहु,तांदूळ, धान्य,कपडे हे लाँकडाउन काळात वाटुन दिले त्या नंतर राज्य सरकारला या 1106 आश्रम शाळेतील 4 लाख 50 हजार आदिवासी विध्यार्थींचा विसर पडला महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री यांनी या साडेचार लाख आदिवासी विध्यार्थीना त्वरीत पोषण आहार द्यावे त्याची सद्या फार आवश्यकता पण आहे अशी मागणी प्रकाश गेडाम, प्रदेश सरचिटणीस, भाजपा STM,महाराष्ट्र प्रदेश तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलित मित्र, महाराष्ट्र यानी केली आहे.
शासकीय,अनुदानित आश्रम शाळेतील साळेचार लाख विध्यार्थी पोषण आहारापासुन वंचित ; सरकारने विध्यार्थींकडे लक्ष द्यावे -प्रकाश गेडाम,प्रदेश सरचिटणीस
152 Views