किनवट/ प्रतिनिधी: किनवट पासुन10 किमी अंतरावर असलेला”लोणी मध्यम प्रकल्प” असून अनेक वर्षांपासून तलावाच्या पाळू वरील झाडे तोडली नसल्याने ती मोठी होत आहेत.परिणामी मुळेही दूरवर पसरत आहेत. त्यामुळे बांध फुटून धोका निर्माण होऊ शकतो.
या बांधा खाली लोणी गाव आहे.बांध फुटला तर मोठी मानवी जीवित हानीची शक्यता नाकारता येत नाही.
संपूर्ण लोणी गावाला या प्रकल्पाचा धोका निर्माण झाल्याची भीती गावकऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे.
संबंधीतांनी यांची वेळेवरच दखल घेऊन बांधा वरील झाडी तोडून नष्ट करावी अशी मागणी गावकऱ्यांतुन होत आहे.
263 Views