किनवट/प्रतिनिधी: मौजे दाभाडी ता.किनवट जि.नांदेड. नाल्यावर सिमेंट बांधारा तुटून पुराच्या पाण्यात पिकासह जमिनीही खरडून गेल्याने प्रचंड नुकसान झाले.
किनवटच्या जलसंधारण विभागाकडून गुत्तेदाराच्या माध्यमातून निकृष्ठ बांधांरा बांधला. गतवर्षीच बांधारा तयार झाला. कामात दर्जा नसल्याच्या तक्रारी होत्या. परंतू संबिंधित अभियंते आणि गुत्तेदाराच्या संगनमत असल्याने दखल घेतली नाही.राजकीय वरदहस्त असलेला व्यक्ती पडद्याआड होता. म्हणून निकृष्ठ काम केले. आता या नुकसानीस जबाबदार धरुन सर्वच संबंधितांवर कार्यवाही करावी. आणि शेतकर्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी शेतकरी व जनतेतून होत आहे.
177 Views