किनवट/प्रतिनिधी : शहरातील गोकुंदा ग्रामपंचायत येथील वार्ड क्रमांक ४ व ५ मध्ये अजुनपर्यंत पुष्कळ ठिकाणी पक्की नाली व पक्के रस्ते झालेले नसल्यामुळे या मुख्य समस्या घेऊन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे कार्याध्यक्ष तथा पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी ग्रामसेवकास तक्रार देण्यासाठी सदरील वार्ड मधील सर्व महिला व पुरुषांना घेऊन ग्रामपंचायत कार्यालय गाठले. पण गोकुंदा ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक मावळे उपस्थित नसल्याने तेथील कारकुन पवन कोरडवाड जवळ सर्व नागरिकांनी मिळुन लेखी निवेदन देऊन ग्रामसेवकास भ्रमणध्वनीवर सर्व समस्या सांगितल्या.
प्रसार माध्यमांशी बोलताना आशिष शेळके म्हणाले की, वार्ड क्रमांक ४ व ५ मध्ये, १५ ते २० वर्षांपासून पुष्कळ ठिकाणी पक्की नाली व पक्के रस्ते नाहीत, त्यामुळे गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी हे रहिवाशांच्या घरासमोरुन, अंगणातुन तर काही जणांच्या घरात देखील जात आहे, आम्ही या समस्यांचा १५ ते २० वर्षांपासून सामना करत आहोत, वारंवार आमच्या वार्ड मधील सदस्यांना सांगत आलेलो आहोत, तक्रारी करत आलेलो आहोत पण आजपर्यंत कुणीही यांची दखल घेतली नाही. पण आता जर ही समस्या लवकरात लवकर सोडविली नाही तर आम्ही येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत बहिष्कार टाकु आणि जर कुणी मतदान मागण्यांसाठी आले तर त्यांना याच गटाराच्या पाण्याने व चिखलाने माखु अशी चेतावणी आशिष शेळके सोबतच सर्व महिलांनी व नागरीकांनी दिली.
निवेदन देताना पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांच्या सोबत सदरील वार्ड मधील महिला विमलबाई राठोड, शिवनंदा फड, सावित्रीबाई देवकते, सुलोचना हुरदुके, छाया राऊत, पंचशिला गायकवाड, सुलोचना वाघमारे, सिताबाई हटकर, जयश्री धुर्वे, सारीका उघडे, अनुराधा मिरासे, शेख रुक्साना, शेख रेहाना, सत्यभामा ढगे तर पुरुष धनंजय वाघमारे, पत्रकार दत्ता जायेभाये, रवी वाठोरे, शेख सुलेमान, प्रल्हाद वाठोरे, कपील शेळके, गंगाधर कदम इत्यादी उपस्थित होते.
वार्ड क्रमांक ४ व ५ मधील सर्व समस्या लवकरात लवकर सोडवा – आशिष शेळके.
151 Views