सुधागड – पाली : सुधागड तालुक्यातील नांदगाव येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि नांदगाव सरपंच यांच्या माध्यमातून भारतीय टपाल सेवा विभागाचे वतीने आधारकार्ड शिबीराचे ५ व ६ जुलै रोजी आयोजन केले होते.
या शिबिरात नवीन आधारकार्ड काढणे, आधारकार्ड दुरूस्ती करणे, आधारकार्ड सोबत मोबाईल लिंक करणे आदी कामे करण्यात आली. नागरिकांनी या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देवून आयोजकांचा हुरूप वाढवला.
लोकांना दाखले मिळावेत व त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये म्हणून सरपंच वैशाली दिघे, नागशेतचे सरपंच राजू धारपवार, ग्रामसेविका वर्षा जाधव यांनी विशेष सहकार्य केले. टपाल विभागाचे विशाल भोपळे व दयानंद यंगलवार यांनी जलद गतीने आधार कार्डची कामे केली तसेच आयोजकांना योग्य मार्गदर्शन केले. या शिबिरात १०० पेक्षा जास्त नागरिकांची आधारकार्डची कामे करण्यात आली. या शिबिराची संकल्पना व आयोजन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रय दळवी यांनी संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्टरित्या सदर शिबीर पार पाडल्यामुळे संघाचे कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, महिला अध्यक्षा दीपिका चिपळूणकर, कोकण संपर्क प्रमुख संतोष व्हावळ, कोकण संघटक संजय लांडगे, कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे, सरचिटणीस महेश महाजन, रायगड जिल्हाध्यक्ष ॲड. रत्नाकर पाटील, रायगड जिल्हा संघटक प्रसाद गोरेगावकर, सुधागड- अध्यक्ष राजू शेख, सर्व जिल्हा व तालुका पदाधिाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
या शिबिरात लाभ घेतलेल्या नागरिकांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, सुधागड- पालीचे आभार मानले आहेत.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून आधार कार्ड शिबीर संपन्न
110 Views