*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.6.विविध शेतांमधील सागवानाची झाडे तोडण्यासाठी आणि त्यासाठी आवश्यक परवानगी देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागणी करून त्यातील 5 हजार पुर्वीच स्विकारून पुन्हा 13 हजार रुपये लाच स्विकारणाऱ्या वनसंरवेक्षक यास लाच लुचप प्रतिबंधक विभागाने गजाआड केले आहे.
एका तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की,त्याची आई, भाऊ आणि इतर मित्रांच्या शेतामधील सागवानाची झाडे तोडायची होती.
त्याचे सर्व्हेक्षण करून आणि झाडे तोडल्यानंतर आवश्यक त्या परवानग्या देण्यासाठी नांदेड विभागाच्या उपवनसंरक्षक कार्यालयातील वन सर्वेक्षक गणेश प्रकाशराव मज्जनवार (35) यांनी दहा हजार रुपयांची लाच मागणी केली. ही तक्रार 11 मे 2022 रोजी आली. तक्रार देण्यापुर्वी गणेश मज्जनवार यांनी पाच हजार रुपये स्विकारले होते. लाच मागणीची पडताळी 1 जुलै 2022 रोजी झाली.
त्यावेळी पाच हजार रुपये लाच देणे शिल्लक होते. त्यात तडजोड करतांना तुमचे काम वाढले आहे.म्हणून 13 हजार रुपयांची मागणी केली आणि ती लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गणेश प्रकाशराव मज्जनवारला ताब्यात घेतले.
पोलीस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे,अपर पोलीस अधिक्षक धरमसिंग चव्हाण, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात आणि पोलीस उपअधिक्षक अशोक इप्पर,पोलीस निरिक्षक अरविंद हिंगोले यांच्या सहकार्याने पोलीस निरिक्षक जमीर नाईक यांनी आणि पोलीस अंमलदार एकनाथ गंगातीर,जगन्नाथ अंनतवार, गणेश तालकोकुलवार,ईश्र्वर जाधव,मारोती सोनटक्के यांनी लाचखोर गणेश प्रकाशराव मज्जनवारला ताब्यात घेतले आहे. मज्जनवार विरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्त लिहिपर्यंत सुरू होती.या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक जमीर नाईक हे करणार आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आईच की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.कार्यालय दुरध्वनी – 02262 253512,राजेंद्र पाटील, पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. नांदेड,मोबाईल नंबर – 7350197197 आणि @ टोल फ्रि क्रं.1064 क्रमांकावर तक्रार नोंदऊ शकता असे ही सांगण्यात आले आहे.