किनवट/प्रतिनिधी: आज शासकीय आश्रम शाळा बोधडी येथे आजादी का अमृत महोत्सव वर्ष तसेच वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र योजना अंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आले .
मा. श्री केशव वाबळे उपवनसंरक्षक नांदेड यांच्या सूचनेनुसार व श्रीनिवास लखमावड सवस रोहयो व वन्यजीव यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष लागवड कार्यक्रमाचे उदघाटन साहाय्यक जिल्हाधिकारी किनवट श्री कीर्ती कुमार पुजार याच्या हस्ते वृक्ष लागवड करून करण्यात आले . या वेळी आश्रम शाळेतील विद्यार्थिनींनकडून 200 रोपे टेकडी वर लागवड करण्यात आले.
आश्रम शाळा येथील कार्यक्रमामध्ये बोलताना श्री पुज्जर म्हणाले की,” वृक्ष लागवड आणि संगोपन ही काळाजी गरज आहे.
श्रीकांत जाधव वन परिक्षेत्र अधिकारी यांनी विद्यार्थिनींना प्रत्येकाने 2 झाडे लागवड करून संगोपन करण्याचे अहवान केले. या प्रसंगी केंद्रे सर मुख्याध्यापक, मुंडे सर,विद्यार्थिनीं,सहशिक्षक, केशव बरलेवाड वनपाल अरुण कुमरे, सोनकांबळे, सुनील ढगे , देशमुखे , गणेश काळे, कोरडे, संदीप काळे व इतर वन कर्मचारी उपस्थित होते.
वृक्ष लागवड आणि संगोपन ही काळाजी गरज- सहाय्यक जिल्हाधिकारी पुजारी; बोधडी आश्रम शाळेत वृक्ष लागवड.
214 Views