KINWATTODAYSNEWS

तालुक्यातील थारा ते दिग्रस हा अंतर्गत डांबरीकरण केलेला रस्ता गेल्या एक वर्षाभरापासून उकडून गेला ;दुरुस्ती ची मागणी

किनवट (प्रतिनिधी) थारा ते दिग्रस जाणारा रस्ता खराब झाल्यामुळे या गावातील विद्यार्थी व गावकऱ्यांना आपले मार्गक्रमण करण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करून ये जा करावी लागत आहे. त्यामुळे तात्काळ हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी येथील गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.
तालुक्यातील थारा ते दिग्रस हा अंतर्गत डांबरीकरण केलेला रस्ता गेल्या एक वर्षाभरापासून उकडून गेला आहे. या रस्त्यावरील गिट्टी उघडी पडली आहे. या मार्गावर असलेल्या अनेक नळकांडी पूलाला सुराक पडले आहे. या मार्गावरून छत्रपती शिवाजी हायस्कूल बेलोरी धानोरा या शाळेला येणारी मानव विकास योजनेची बस ये जा करते पण हा रस्ता खराब झाल्यामुळे ही बस सध्या या मार्गावरून बंद आहे. तसेच या मार्गावर डोंगरगाव मध्यम प्रकल्पाचा पाण्याचा विसर्ग होतो. या नदीवर एक पूल आहे. हा पूल नादुरुस्त झाला आहे. पूलाला खड्डे पडले आहेत त्यामुळे डोंगरगाव, डोंगर तांडा ,चंद्रपूर ते दिग्रस जाणारा प्रवाशांना व विद्यार्थ्यांना अतिशय अडचणीचा सामना करून ये जा करावी लागत आहे. विद्यार्थ्यांची तर फारच परव ड होत आहे.
तरी हा नादुरुस्त रस्ता तात्काळ दुरुस्त करून विद्यार्थ्यांची व गावकऱ्याची होणारी अडचण दूर करावी. अशी मागणी सर्वपक्षीय कार्यकर्ते काँग्रेसचे सुरेश पाटील सोळंके, राष्ट्रवादीचे शंकर पाटील जाधव, रामदास अंबादास पवार , भाजपाचे दिगंबर आरमाळकर , व सत्यनारायण सूर्यवंशी , पमु साबळे, वैजनाथ गीते, माधव कांदे, विठ्ठल मिरासे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद कार्यालय किनवट येथील अधिकाऱ्याकडे केली आहे.

164 Views
बातमी शेअर करा