KINWATTODAYSNEWS

वन गुन्हा प्रकरणातील पकडलेल्या दोन आरोपींच्या चौकशी मधून इतर फरार झालेले 11 आरोपी विभागासमोर शरणागती पत्करून कार्यालयात हजर

किनवट/प्रतिनिधी: काल दिनांक 24/ 6/2022 रोजी काल जप्त केलेल्या वन गुन्हा प्रकरणातील पकडलेल्या दोन आरोपींच्या चौकशी मधून इतर फरार झालेले 11 आरोपी विभागासमोर शरणागती पत्करून कार्यालयात हजर झाले.
नियमानुसार रीतसर कार्यवाही करून नियम व अटी शर्तीच्या अधीन राहून सोडण्यात आले तसेच आज रामनगर भागामध्ये आरोपींच्या सांगण्यावरून एका फर्निचर दुकानाचे तपासणी केली असता त्यामध्ये बराच अवैध सागी माल मिळून आला परंतु फर्निचर दुकानाचा मालक पळून जाण्यात यशस्वी झाला.

त्या दुकानांमध्ये अंदाजे 60 ते 70 हजार रुपयाचा जप्त करण्यात आला
या कार्यवाहीत माननीय उपवनसंरक्षक नांदेड वाबळे साहेब माननीय सहाय्यक वनसंरक्षक श्री जी डी गिरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक किनवट श्री पी एल राठोड साहेब तसेच नवनियुक्त वन परिमंडळ अधिकारी किनवट श्री एस एम कोंपलवार साहेब श्री एस एन सांगळे साहेब श्री जि. टी. माझळकर साहेब श्री टी आर घोडके वनरक्षक फिरते पथक लेखापाल श्री एम जे गंगलवाड साहेब वनसेवक श्री भावसिंग जाधव तसेच वाहन चालक बाळकृष्ण आवले, वनपाल चिखली एम एन कत्तूलवार वनपाल अंबाडी बी एस संतवाले वनपाल नीचपुर एस एम यादव वनरक्षक पि के मुळे एस एम वैद्य कर्तव्यदक्ष महिला वनरक्षक पि के माहुरे कोमल मरस्कोल्हे वन सेवक भावूसिंग जाधव शेख रफीक लिंगा पेंदोर मारुती पाटील गरड यांचा कारवाईत समावेश होता

168 Views
बातमी शेअर करा