लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या हस्ते लातूर (पाखरसांगवी) येथील श्री रवींद्रनाथ टागोर शाळेच्या वाढीव वर्गाच्या खोलीचे भूमिपूजन, नियोजित जागेत लिंब, चिंच, आंबा, गवती चहा, इलायची आदी वृक्षांचे रोपण करण्यात आले. तसेच सहावी, सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आले.
याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, जिल्हा महिला अध्यक्षा वैशालीताई पाटील, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, जिल्हा संपर्क प्रमुख रियाज शेख, शाळेच्या मुख्याध्यापिका मेघा पाटील, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपले आई-बाबा, गाव, तालुका, जिल्हा, राज्य व देशाचे नाव रोशन करावे यासाठी संस्था सचिव वैशालीताई पाटील सातत्याने प्रयत्न करीत आहेत. विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, मोफत ड्रेस,मोफत भोजन, मोफत प्रवास अशा विविध प्रकारच्या सवलती देत संस्थेच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून श्री रवींद्रनाथ टागोर विद्यालय, पाखरसांगवी ही शाळा यशस्वीतेकडे वाटचाल करीत असून या शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले असल्याने या शाळेशी आमचे कायम ऋणानुबंध आहेत अशी संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी आपली भावना व्यक्त केली.
जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांनी वृक्षारोपणाचे महत्व सांगून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी झपाटलेल्या श्री रवींद्रनाथ टागोर विद्यालयासाठी आमची संघटना कायम सोबत असल्याचे प्रतिपादन केले. तर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे व जिल्हा संपर्क प्रमुख रियाज शेख यांनी शाळेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी व या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवावे अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांचे मुख्याध्यापिका मेघा पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.
संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या हस्ते शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन व वृक्षारोपण
101 Views