KINWATTODAYSNEWS

सरस्वती विद्या मंदिर विद्यालय किनवटचा १० वीचा निकाल ९६.६८ टक्के (यशस्वी परंपरा कायम)

किनवट = (ता.प्र.) सरस्वती विद्या मंदीरच्या विद्यार्थ्यांनी १० वी निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली असुन शिक्षण संस्थेच्या किनवट व मांडवा शाखेच्या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय किनवट शाखेतुन रेजितवाड अर्जुन बालाजी याने ९७.४० टक्के एव्हडे गुण प्राप्त करुन पहिला क्रमांक मिळवला. असुन मराठी माध्यमचा निकाल ९६.६८ टक्के आहे.

तर सेमी माध्यमचा निकाल १०० टक्के एव्हडा आहे. सरस्वती विद्या मंदिर मांडवा येथील निकाल ९२.३० टक्के एव्हडा असुन कु. प्रतिक्षा अशोक साळवे हिने ८५ टक्के गुण प्राप्त केले आहे. तर कु. कवडे अश्विनी राहुल हिने ८१ टक्के घेवुन व्दितीय क्रमांक व गिते शिवराज माधव याने ७३ टक्के गुण प्राप्त करुन तुतिय क्रमांक मिळविला आहे. तसेच सरस्वती विद्या मंदिर किनवट शाखेमधुन राठोड योगेश्वर संतोष ९६.४० टक्के गुण व देशपांडे सार्थक धनंजय ९५ टक्के गुण घेवून अनुक्रमे व्दितीय व तुतिय क्रमांक घेतला आहे. ९० ते १०० गुणप्राप्त करणारे एकुण २३ विद्यार्थी, ८० ते ९० गुणप्राप्त करणारे ३९ विद्यार्थी व ७५ ते ८० गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २३ एव्हडी आहे. या विद्यार्थ्यांंच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व्यंकटराव नेम्मानीवार, उपाध्यक्ष नरसिंग सातुरवार, अँड. शंकरराव राठोड, मुख्याध्यापक कुष्णकुमार नेम्मानीवार, पर्यवेक्षक संजय चव्हाण, प्रा. रेणूकादास पहुरकर, मांडवा शाखेचे मुख्याध्यापक नरसिंग नेम्मानीवार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

226 Views
बातमी शेअर करा