KINWATTODAYSNEWS

शहरातुन जाणारा राष्ट्रीय महामार्गा चा तिढा आता संपुष्टात?

किनवट = (ता.प्रतिनिधी) किनवट शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाचा तिढा आता जवळपास संपुष्ठात आला आहे. दि. १६ जून रोजी विदर्भातील पुसद येथील उपवनसंरक्षक सोनकुसरे आणि किनवटचे सहायक जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष संयुक्त स्थळ पहाणी केल्यानंतर सत्यता समोर आली. २० जून रोजी यवतमाळच्या जिल्हाधिकार्‍यांकडे जशाचा तसा स्थळ पहाणी अहवाल ठेवला जाणार आहे. त्या बैठकीत १०० फूट रुंदीच्या निर्णयावर अंतीम शिक्कामोर्तब होणार असल्याने विकासप्रेमींचा आनंद द्विगुणीत झाल्याचा पहायला मिळाले.
पुर्वी किनवट तालुका हा आँध्रप्रदेशात असल्यामुळे सन १९५१ आणि त्यानंतर १९७१ वरही झालेल्या बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ ए. हा किनवट शहरातून इक्कोझोनच्या सबबीखाली केवळ आठरा मिटर करण्यावर कार्यकारी अभियंत्याचे हात गुंतल्याने जोर लागला होता. परंतू शहराच्या भावी विस्ताराचा, विकासाचा प्रश्न लक्षात घेऊन प्रारंभी शिवसेनेचे व्यंकट भंडारवार, प्रशांत कोरडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश राठोड, वैजनाथ करपुडे आणि अमरदीप कदमांनी थेट केंद्रियमंत्री गडकरींना आव्हान देऊन उपोषणाचे अस्त्र काढले होते. त्यानंतर माजी आमदार प्रदीप नाईकांनीही सर्वंकश प्रयत्न केले. संदीप बॅनर्जींनी याकामी अतिशय मोलाचे काम केले.
सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांनीही या विषयाला गांभीर्याने घेतल्याने वारंवार बैठका पार पडल्या. त्याचाच एक भाग म्हणून दि. १६ जून रोजी पुसदचे उपवसंरक्षक सोनकुसरे यांनी स्थळ पहाणीसाठी किनवटला आले. सहाय्यक जिल्हाधिकारी पुजार यांची प्रत्यक्ष संयुक्त स्थळ पहाणी झाली त्यावेळी सत्यता समोर आली. हा अहवाल २० जून रोजी जशाचातसा यवतमाळच्या जिल्हाधिकार्‍यांच्या समोर मांडण्यात येणार आहे. जवळपास १०० फुटाच्या रुंदीचा तिढा आता संपुष्ठात आला आहे. या बैठकीत ब-याच मान्यवरांची उपस्थिती होती.

260 Views
बातमी शेअर करा