KINWATTODAYSNEWS

तासाला 712 किलो ऑक्सिजन देणारा “वड ” लागवड सीईओंचा उपक्रम स्तुत्य -आ. भीमराव केराम शाळारंभाच्या सर्वांना शुभेच्छा !

किनवट : एका तासाला सातशे बारा किलो ऑक्सिजन व उन्हाळ्यात दिवसाला 2 टन पाणी बाष्प स्वरूपात वातावरणात सोडणाऱ्या वडाचे झाड लावण्याचा अनोखा , स्तुत्य उपक्रम सीईओ मॅडमनी राज्यातून फक्त नांदेड जिल्ह्यात राबविला आहे. असे गौरोद्गार आमदार भीमराव केराम यांनी काढून शाळारंभाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषद नांदेडच्या उपक्रमशील मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांच्या नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत वट पौर्णिमेनिमित्त येथील गट शिक्षणाधिकारी प्रांगणात आमदार भीमराव केराम यांचे हस्ते “वडवृक्ष लागवड” करण्यात आली. तद्नंतर ” सुंदर माझे कार्यालय” उपक्रमांतर्गत कार्यालयाच्या अंतर्गत व बाह्य सजावटीची त्यांनी पाहणी करून प्रशंसा केली. यावेळी बोलतांना आ. केराम म्हणाले की, तालुक्यात राबविण्यात येणार स्कॉलर-500 व मिशन 100 IAS हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेला प्रोत्साहन देण्यासाठीच्या या उपक्रमाला आवश्यक ती मदत करायला मी तयार आहे. कोविड-19 च्या विदारक परिस्थितीला सामोरं जाता दोन वर्षानंतर शाळेचं कुलप उघडत आहे. तेव्हा नुतन शैक्षणिक वर्षाच्या शाळारंभा निमित्त विद्यार्थी, पालक, शिक्षक व शैक्षणिक प्रवाहातील सर्वांना शुभेच्छा देतो. असेही ते म्हणाले.
तद्नंतर सभागृहात गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी त्यांचा सत्कार केला. आमदार केराम यांनी सर्व शैक्षणिक उपक्रम व योजनांची माहिती घेतली. पेसा अंतर्गत क्षेत्र असल्याने शिक्षकांसह इतर कोणतेही पद रिक्त ठेऊ नये अशी सूचना त्यांनी प्रशासनाला केली.
यावेळी पंचायत समिती माजी सदस्य निळकंठ कातले , विस्तार अधिकारी (शिक्षण) संजय कराड, ना.ना. पांचाळ व कार्यालयीन सर्व कर्मचारीवृंद उपस्थित होते. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. बाबू इब्बितदार यांनी आभार मानले.

78 Views
बातमी शेअर करा