किनवट/प्रतिनिधी: आज दिनांक 11 जून, 2022 रोजी नांदेड येथे टिपू सुलतान ब्रिगेडची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी टिपू सुलतान बिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष डॉ. ज़हीरूद्दिन पठान होते आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हाध्यक्ष सय्यद नदीम, जिल्हा संघटक फयाज पठाण यांची उपस्थिती होती. या बैठकीत टिपू सुलतान बिग्रेडच्या किनवट तालुका अध्यक्षपदी शेख अजमल शेख सलाओद्दीन यांची निवड करण्यात आली व किनवट तालुका उपाध्यक्षपदी शेख ज़ुबेर यांची आणि तालुका सचिवपदी शब्बीर इक्बाल खान यांची निवड करण्यात आली. याच बैठकीत मुदखेड तालुका अध्यक्ष सय्यद मुजीब, नांदेड शहर अध्यक्ष (दक्षिण) शेख एजाज़ यांची सुद्धा निवड करण्यात आली. बैठकीला उमरी तालुकाध्यक्ष सय्यद फेरोज पटेल, विद्यार्थी ब्रिगेड उमरी तालुकाध्यक्ष सय्यद सुलेमान पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.
या निवडीबद्दल सर्वांचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष डाॅ. ज़हीरूद्दिन पठान यांनी टिपू सुलतान ब्रिगेडची ध्येय आणि धोरणे, मा. शेख सुभान अली सरांचे महापुरूषांचे विचार नांदेड जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक घरात पोहोचविण्याचा आणि समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही मूल्यं रुजविण्याचा तसेच संविधानावर आधारित समाज निर्माण करण्याचा, देश सेवेसाठी आणि मानव सेवेसाठी समर्पित युवा पिढी निर्माण करण्याचा मानस बोलून दाखविला.
जिल्हाध्यक्ष सय्यद नदीम आणि जिल्हा संघटक फयाज पठाण यांनी नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
टिपू सुलतान ब्रिगेड किनवट तालुका अध्यक्षपदी अजमल शेख यांची निवड
232 Views