किनवट/प्रतिनिधी :-
माजी आमदार प्रदिप नाईक यांच्या काळात अवैध धंदे मटका जुगार विना परवाना दारु दुकानाला बिलकुल थारा नव्हता परंतु नंतर अवैध धंदे का फोफावले हा प्रश्न लोकांना पडला आहे
किनवट येथे दोन चार महिन्याआधी आमदार केराम साहेब यांच्या पोलिस प्रशासनाला दिलेल्या सुचनेनंतर मटका काही महिने बंद झाला होता तेव्हां परंतु पुन्हा मटका जुगाराने डोक वर काढले आहे भाजी मार्केट, कै.गोंडराजे मैदान परिसर, महात्मा फुले चौक येथे खुले आम मटका सुरु आहे याचा परीणाम हातावर पोट असणाऱ्या मजुरदार वर्गावर व युवकावर होत आहे यामध्ये रीक्षा चालक, हमाल, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, पानटपरी चालक, घराला रंग मारणारे पेंटर, बांधकाम करणारे मिस्त्री अशे रोजंदारीवर काम करणाऱ्यांच्या संसारावर याचा प्रतिकुल परिणाम दिसुन येत आहे मजुरदार दिवसभराची कमाई मटका जुगारावर लावत आहे यामुळे महीलांचे संसार देशोधडीला लागले आहे तरी हा मटका जुगारे अवैध दारुचे अड्डे तात्काळ बंद करावे व गरीब जनतेचे लोकप्रिय आमदार केराम साहेबांनी पोलिस प्रशसनास त्या प्रकारच्या सुचना द्याव्या अशी आर्त हाक महिंलाकडुन होत आहे.
किनवट येथे मटका जुगारामुळे अनेकांचे संसार देशोधडीला
215 Views