मांडवी/ प्रतिनिधी
मांडवी परिसरामध्ये अनेक रस्त्याचे रुंदीकरणाचे काम चालू असून त्यातच पुलाचे बांधकाम हे मोठ्या प्रमाणात केला जात असून या पुलाच्या बांधकामाकडे गुणवत्ता विभागाचे लक्ष आहे का अशी नागरिकांतून चर्चा होत आहे अनेक पुलाचे बांधकाम हे प्रमाणित बाधकामा मापा पेक्षा कमी मापाचे करण्यात येत आहे अंदाजे प्रमाणात बांधकामे हे 33बाय 23 फूट या प्रमाणे असायला पाहिजे पण अनेक पूल हे 30 बाय 20 फूट याप्रमाणे बांधकाम करण्यात येत आहे त्याच्यामुळे अरुंद पूल बनल्यामुळे मुळातच रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम चालू असून हे अरुंद पुल समोर चालून त्या रस्त्याचे बांधकाम करण्यात अडचण निर्माण होवू शकते असे नागरिकातून चर्चा होत आहे.
मांडवी परिसरामध्ये अनेक पुलाचे बांधकाम चालू असून या बांधकामावर वापरल्या जात असलेले सेमेट हे हलक्या दर्जाचे असून यावर रेती ही माती मिश्रित असून बांधकाम विभाग व गुणवत्ता विभाग या बाबीकडे लक्ष देईल का अशी विचारणा जनतेतून होत आहे
अनेक पुलाचे बांधकाम आहे पूर्णपणे झालेल्या असून लगेच काही दिवसातच ते बांधकाम झालेले फुल हे रस्त्यासाठी खुली करण्यात आलेले आहे त्यामुळे त्या बांधकामावर टाकण्यात आलेले पाणीही बंद झालेले आहे जर 21 दिवस हे पाणी टाकले नाही तर बांधकाम हे पूर्णपणे क्युरी होणार नाही असे बांधकाम करणारे सांगत असतात तरीही पूल बांधकाम हे आठ दिवसातच वाहनासाठी खुले करून पुन्हा कोणत्याही प्रकारचे पाणी टाकला जात नसल्यामुळे होणारे बांधकामे क्युरिंग झाली नसल्याने लगेच पुल हे पडले जाईल अशी चर्चा होत आहे
मांडवी परिसरातील पुलाचे बांधकाम हे दर्जाहीन
190 Views