किनवट/ प्रतिनिधी : मोठमोठ्या खड्ड्यांमुळे जीवघेण्या बनलेल्या गोकुंदा येथील स्व बाळासाहेब ठाकरे चौक ते हबीब कॉलनी पर्यंतच्या रस्ता दुरुस्तीसाठी मागील वर्षभरापासून सतत पाठपुरावा करून सुद्धा हा रस्ता दुरुस्त होत नसल्यामुळे शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा दिशा समिती सदस्य मारुती सुंकलवाड आक्रमक झाले असून हा रस्ता आठ दिवसात दुरुस्त न झाल्यास 6 जून2023 रोजी पासून एकवीरादेवी मंदिरासमोर रस्त्यावरील खड्ड्यात बसून प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा त्यांनी उपअभियंत्यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात नमूद केले आहे की गोकुंदा येथील स्व बाळासाहेब ठाकरे चौक ते पेटकुले नगर व पेटकुले नगर ते हबीब कॉलनी चौक पर्यंतचा रस्ता मागील कित्येक वर्षांपासून नादुरुस्त असून या रस्त्यावर गुडघ्याइतके खोल मोठमोठे खड्डे पडून तलावा प्रमाणे पाणी साचत आहे बारा महिने या रस्त्यावर सांडपाणी साचून राहत असल्यामुळे या रस्त्यावरून विद्यार्थी, लहान बालके व वृद्धांना पायी चालने सुद्धा धोकादायक बनले आहे कित्येक वेळा रस्त्यावरील खड्यामुळे वाहनांचे अपघात होऊन जीवित हानी होण्याचे प्रसंग उद्भवले असल्याने या रस्त्याची तात्काळ दुरुस्त करावी यासाठी मागील वर्षभरापासून प्रशासनाकडे सातत्याने तोंडी व लेखी स्वरूपात निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात येत आहे परंतु प्रशासन दखल घेण्यास तयार नाही यासंदर्भात 29 जून 2021 रोजी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना बांगड्या घालण्याचे निषेधात्मक आंदोलन केले होते त्यावेळी पंचायत समिती कार्यालयाने तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले परंतु वर्षे लोटले तरी या आश्वासनाची अद्याप पूर्तता झाली नाही सद्यस्थितीत या संपूर्ण रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून भविष्यात या रस्त्यावर जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही रस्त्यावरील खड्यामुळे होणारे अपघाताचे प्रसंग व जीवित हानी टाळण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने 8 दिवसाच्या आत हा रस्ता दुरुस्त करावा अन्यथा 6जून 2022 रोजीपासून एकविरादेवी मंदिराच्यासमोरील रस्त्याच्या खड्ड्यत बसून प्राणांतिक उपोषण करण्याचा इशारा मारोती सुंकलवाड यांनी निवेदनातून दिला आहे निवेदनाच्या प्रती सर्व संबंधितांना पाठविल्या आहेत.
आठ दिवसांपूर्वीच काँग्रेसचे जेष्ट कार्यकर्ते , किनवट टुडे न्युजचे संपादक आनंद भालेराव यांनीही याच रस्त्यासाठी बातमी प्रसारित करून आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते. सदरील रस्ता पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करावी ही रास्त मागणी समोर येत आहे.
स्व. बाळासाहेब ठाकरे चौक ते हबीब कॉलनी पर्यंतच्या रस्ता दुरुस्तीसाठी निवेदन सादर
491 Views