*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.20.जिल्यातील धर्माबाद येथे विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारूनीक तथागत गौतम बुद्ध यांच्या 2566 व्या जयंतीचे औचित्य साधून धर्माबाद येथील शास्त्रीनगर फुलेनगर येथे दिनांक 20 मे 2022 रोजी शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता बुद्ध -भीम जयंती महोत्सवाचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.
सदरील महोत्सवाचे उद्घाटन माननीय आमदार अमरनाथ राजूरकर (विधिमंडळ गटनेते विधान परिषद महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे.
तसेच प्रमुख पाहुणे देगलूर- बिलोली मतदार संघाचे आमदार जितेश अंतापूरकर,माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर, व्ही.पी.के.समूहाचे अध्यक्ष मारोतराव कवळे गुरुजी,ड्रा. काकाणी,वर्णी नागभूषण संचालक कु.ऊ.बा.स. नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे उपमहापौर अब्दुल गफार अब्दुल सत्तार,शिक्षण व बांधकाम समिती सभापती संजयजी आप्पा बेळगे,श्रीराम पाटील जगदंबे पिंपळगावकर,माजी महापौर प्रतिनिधी किशोर भवरे,विजय येवणकर,नांदेड जिल्हा अल्पसंख्यांक सेलचे शमीम अब्दुल्ला,नगरसेवक नांदेड महानगर पालिका संदीप सोनकांबळे,भा.ज.पा.चे रवी अण्णा पोतगंट्टी,दत्ताहरी आवरे,धर्माबाद नगर पालिकेचे उपनगर अध्यक्ष विनाकारावजी कुलकर्णी,देविदास बिपटवार,रमेश पाटील,धर्माबाद काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष सौ अर्चना माधराव शिंदे,व्येकट पाटील मोरे माजी संचालक,फुलाजी पाटील हरेगाव कर,सुरेकांत पाटील जुन्नीकर, बालाजी पाटील कारेगावकर,बाबुराव पाटील,यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थितिथ होते.
सायंकाळी 5 वाजता भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते पूजा विधी संपन्न झाला.
सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक कुणाल वराळे व संच औरंगाबाद यांचा प्रबोधनात्मक बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला आहे.
या कार्यक्रमाला धर्माबाद तालुक्यातील गावा गावातून भीम गीताचा कार्यक्रम आयकण्यासाठी बायका लेकरांन सोबत आवरजून मोठया संख्येने उपस्तिथ होते.यावेळी आयोजक मोईजोद्दीन सलीमोद्दिन करखेलीकर व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती फुलेनगर,धर्माबाद यांनी भरभरून साथ दिल्या मुळे सर्वांचे आभार मानले आहेत.