KINWATTODAYSNEWS

धर्माबाद येथे बुद्ध-भीम जयंती महोत्सवाचे आयोजन

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.18.जिल्यातील धर्माबाद येथे विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारूनीक तथागत गौतम बुद्ध यांच्या 2566 व्या जयंतीचे औचित्य साधून धर्माबाद येथील नगर येथे दिनांक 20 मे 2022 रोजी शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता बुद्ध -भीम जयंती महोत्सवाचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.सदरील महोत्सवाचे उद्घाटन माननीय आमदार अमरनाथ राजूरकर (विधिमंडळ गटनेते विधान परिषद महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते होणार आहे.

तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार,माजी आमदार तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्‍हाण,देगलूर- बिलोली मतदार संघाचे आमदार जितेश अंतापूरकर,माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर,नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर, काँग्रेस कमिटी उपाध्यक्षा मीनलताई खतगावकर,जि. प. सदस्या पुनमताई राजेश पवार, व्ही.पी.के.समूहाचे अध्यक्ष मारोतराव कवळे गुरुजी, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे उपमहापौर अब्दुल गफार अब्दुल सत्तार,शिक्षण व बांधकाम समिती सभापती संजय आप्पा बेळगे,नगरपंचायत नायगाव चे उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, माजी महापौर प्रतिनिधी किशोर भवरे,नांदेड जिल्हा अल्पसंख्यांक सेलचे शमीम अब्दुल्ला,माजी उपमहापौर विलास धबाले यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला लागणार आहे.

सायंकाळी 5 वाजता भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते पूजा विधी संपन्न होईल.सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक कुणाल वराळे व संच औरंगाबाद यांचा प्रबोधनात्मक बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक मोईजोद्दीन सलीमोद्दिन करखेलीकर व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती फुलेनगर,धर्माबाद यांच्या वतीने करण्यात आले आहे.

361 Views
बातमी शेअर करा