आशिष चेडगे • नवप्रहार उपजिल्हा
साकोली : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य शासन मान्यताप्राप्त पत्रकार संघाच्या सातारा जिल्ह्यातील पत्रकाराला एकाने भ्याड धमकी दिली. तात्काळ त्यांनी संस्थापक अध्यक्ष यांना कळविले व अवघ्या तासातच सुत्र हालवित त्या धमकीबाजांचा वेळीच बंदोबस्त करीत संघाच्या पत्रकारासोबत न्याय केल्याची अभिमास्पद बाब सातारा जिल्ह्यात झाली आहे. या गर्वमय विषयाने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील PSVPSS तील पदाधिका-यांच्या माना ताठ उंचावल्या आहेत हे विशेष..!
दिलीप वाघमारे पत्रकार लोणंद जि. सातारा हे प्रेस संपादक पत्रकार सेवा संघातील पदाधिकारी असून एका बातमीविषयी सातारा जिल्हा येथील सुनिल खरात या व्यक्तीने वाघमारे यांना पाहून घेण्याची व त्यांचा मिडीयाच बंद करण्याची भ्याड धमकी दिली, त्यांनी ही बाब संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. डि.टी. आंबेगावे यांना सांगितले तसेच अध्यक्षांनी तातडीने सुत्र हलवित त्या भ्याड धमकीबाजांचा वेळीच बंदोबस्त करीत अवघ्या तासातच पत्रकार वाघमारे यांना न्याय प्रदान केला आहे. महाराष्ट्रात या गौरवपूर्ण विषयाची सर्व जिल्ह्यात चर्चा सुरू असून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या शासन मान्यताप्राप्त संघातील प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिका-यांनी व सभासदांनी गर्व व अभिमानास्पद बाब व्यक्त केली आहे. तर संस्थापक अध्यक्ष मा. डि. टी. आंबेगावे यांनी आमच्या संघटनेच्या पत्रकारांना विनाकारण कुणी त्रास देत असेल तर त्याला त्याची औकातीची जागा दाखविल्याशिवाय रहाणार नाही व आमच्या संघटनेच्या पत्रकारांकडे चूक नसतांनाही जर कुणी बोट दाखविणार तर त्याचे बोट जागेवर ठेवणार नाही अश्या कणखर भाषेत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ समुहातून वक्तव्य केले आहे.
पत्रकारांवर भ्याड धमकीबाजांचा प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ अध्यक्षांनी अवघ्या तासातच बंदोबस्त करीत केला न्याय
533 Views