घुघुस/प्रतिनिधी: जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यास होत असलेल्या समस्येबाबत महामहिम राष्ट्रपती साहेब भारत सरकार व राज्यपाल साहेब महाराष्ट्र शासन यांच्याकडे जिल्हाधिकारी, जिल्हा कार्यालय चंद्रपूर यांच्यामार्फत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी घुघुस च्या वतीने निवेदन सादर. करण्यात आले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आली आहे सन 2015 पासून जात वैधता प्रमाणपत्र तयार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जाचक अटी/नियमांमुळे राज्यातील अनेक विद्यार्थी व नागरिक जात प्रमाणपत्र अथवा जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरीता अनेक समस्यांमध्ये अडकलेले आहेत.
वडिलांच्या/ व्यक्तीचा जन्म ज्या जिल्ह्यात झालेला आहे ये तिथूनच जात वैधता प्रमाणपत्र काढावी असा नियम लागू केल्यामुळे जी व्यक्ती 10 ते 15 वर्षापासून किंवा अधिक काळ जिल्ह्यात वास्तव्य करीत असेल तरीसुद्धा त्याच्या जन्म झालेल्या जिल्ह्यातूनच जात प्रमाणपत्र काढावे असा जाचक अटी लावल्यामुळे अनेक विद्यार्थी जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र पासून वंचित आहेत.
जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र यासाठी 2015 पासून झालेला हा बदल सर्व व सामान्य विद्यार्थी व पालकांना गैरसोयीचा ठरत आहे.चंद्रपूर जिल्हा ते लातूर जिल्हा 500 ते 650 किलोमीटर किंवा त्याहूनही जास्त किलोमीटर प्रवास करावा लागत आहे.
तरी आपण उचित नियोजन करून वास्तव्यास असलेल्या व्यक्तीच्या स्थाई जिल्ह्यातूनच जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळाले पाहिजे. याकरिता ची कारवाई करून पंधरा दिवसात निकाल द्यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस(अ.जा.आघाडी) घुघुस चे ता.अध्यक्ष सत्यनारायण डकरे शासन नियमात बदल करण्यासाठी शहीद होण्यास तयार आहे.
सदरील बदल खरोखर पालक व विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण माझ्या मुलगा चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्णालयातच झाला आणि आम्ही 30 वर्षापासून परिवारासह येथेच वास्तव्यास आहोत. तरीसुद्धा माझ्या मुलाचे जात प्रमाणपत्र काढण्यासाठी मला लातूर जिल्ह्यात जावे असे सांगण्यात आले. चंद्रपूर जिल्हया पासून लातूर जिल्हा जवळपास 650 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांचा पैसा आणि वेळ वाया यात आहे.
ही समस्या फक्त माझीच नाही तर चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण जिवती तालुक्याची डोकेदुखी ठरली आहे. कारण अजोबा वडिलांचा जन्मा हा लातूर जिल्ह्यातील असून मुलांचे जन्म चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील असल्यामुळे सध्याची ही समस्या समस्या निर्माण होत आहे. यावर प्रशासनाने ताबडतोब तोडगा काढावा व सर्व नागरिकांना या समस्येतून सुटका मिळावी असा शासन निर्णय अमलात आणावा अशी या परिसरातील सर्व नागरिकांकडून मागणी होत आहे.
जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळवणे घुगुस व जिवती तालुक्यात ठरत आहे डोकेदुखी ; समस्येबाबत महामहिम राष्ट्रपती व राज्यपाल यांच्याकडे जिल्हाधिकारी,जिल्हा कार्यालय चंद्रपूर यांच्यामार्फत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी घुघुस तर्फे निवेदन सादर
289 Views