KINWATTODAYSNEWS

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमा अंतर्गत महर्षी मार्कंडेय बहूउद्देशीय सेवाभावी संस्था, मांडवी च्या पुढाकाराने लोकसहभागातून पाटोदा (बु) येथील धरणात साचलेला गाळ काढण्याच्या मोहिमेला आज सुरुवात

किनवट: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमा अंतर्गत महर्षी मार्कंडेय बहूउद्देशीय सेवाभावी संस्था, मांडवी च्या पुढाकाराने लोकसहभागातून पाटोदा (बु) येथील धरणात साचलेला गाळ काढण्याच्या मोहिमेला आज सुरुवात करण्यात आली. याचा शुभारंभ आमदार भिमरावजी केराम साहेब, सहा.जिल्हाधिकारी किर्ती किरण एच पुजार, तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान आमदार भिमरावजी केराम साहेब व सहा.जिल्हाधिकारी पुजार यांनी जास्तीत जास्त गाळ वाहून नेण्यासाठी उपस्थित शेतकऱ्यांना आव्हान केले. यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव प्रवीण श्रीमनवार, सभापती प्रतिनिधी दत्ता आडे, संध्याताई राठोड, बजरंगरेड्डी सिंगडवार, संजीवरेड्डी येल्टीवार, गजानन बंडेवार, गणेश श्रीमनवार, मा.सरपंच भारत सोनूले, उपसरपंच रामराव सोनूले, संतोष सोनूले, रमा सोनूले, जयपाल गौतम, चंदूसिंह गौतम, गणेश उईके, धर्मा सोनूले, संतोष चांदेकर, आनंद सोनूले, किरण पवार, शिवपाल जाधव, मोतिसिंग ठाकूर, नंदू सोनूले, रमेश उईके, शंकर वाडगुरे, प्रथम सोनूले यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

264 Views
बातमी शेअर करा