किनवट (शहर प्रतिनिधी)आज दी 16.05.2022 रोजी किनवट तालुक्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सहविचार सभा बाबासाहेब मुखरे विद्यालय किनवट येथे आयोजित करण्यात आली होती. या सहविचार सभेत तालुक्यातील शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदरील सभेत उपस्थित कर्मचाऱ्यांनी शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या लिपिक वर्गीय कर्मचारी कार्यशाळे बाबत मा. शिक्षणाधिकारी व शिक्षण विभागाचे आभार मानले.या नंतर तालुक्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यां अडचणी जाणून घेतल्या व सर्वांशी चर्चे अंती नूतन तालुका कार्यकारणी निवड करण्याचे ठरले . सदरील सभेत सर्वांनी बिनविरोध व बहुमताने पुढील प्रमाणे कार्यकारणी निवड केली. किनवट तालुका खाजगी कर्मचारी संघटना. तालुका अध्यक्ष म्हणून अशोक हिंगणे यांची निवड करण्यात आली.उपाध्यक्ष नागनाथ बस्वदे ,कार्याध्यक्ष अमोल केशवे,सचिव नामदेव रामतिर्थकर,सहकार्याध्यक्ष विष्णू मडावी,कोषाध्यक्ष बाळू शेंडे,प्रसिद्धी प्रमुख आनंदराव सोनटक्के,संघटक दिगंबर घोगरे कार्यकारिणी सदस्य म्हणून रवि मुंडे, व जाधव मॅडम ,गणेश तोंडे यांची निवड करण्यात आली.
या वेळी नांदेड जिल्हा खाजगी शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटना जिल्हा कार्याध्यक्ष गंगाधर पाटील सोळंके,सचिव प्रकाश फाजगे,सहकार्याध्यक्ष राघवेंद्र इनामदार (हिमायतनगर) जिल्हा कोषाध्यक्ष सुभाष देशमुख यांची उपस्थित होती.या वेळी तालुक्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवून त्यांच्या प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया तालुकाध्यक्ष अशोक हिंगणे यांनी व्यक्त केली यावेळी तालुक्यातील शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नूतन कार्यकारिणीस मुख्याध्यापक संघ किनवट तालुका यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
किनवट तालुक्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सहविचार सभा सम्पन्न
338 Views