KINWATTODAYSNEWS

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांचा सन्मान

लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांची हिंदी चित्रपटात पंडितजींची उत्कृष्ट भूमिका साकारली असून दमदार कामगिरीला सुरुवात झाल्याने व विविध कार्यकारी सहकारी सोसायटी खंडाळाच्या नवनिर्वाचित संचालक मंडळावर बिनविरोध निवड झाल्याने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा लातूरच्या वतीने नुकताच यथोचित सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, लातूर जिल्हा महिला अध्यक्षा वैशालीताई पाटील, लातूर जिल्हा संघटक संजय राजुळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, लातूर जिल्हा उपाध्यक्ष महादेव पोलदासे, ॲड.उदय दाभाडे, सामाजिक कार्यकर्ते दिपक करडखेले आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे, महिला जिल्हाध्यक्षा आशाताई चांदणे, जिल्हा उपाध्यक्ष विजयाताई कर्णवर, जिल्हा सचिव प्रमिला जाधव, माढा तालुका अध्यक्ष कुंदन वजाळे, माढा तालुका उपाध्यक्ष सिद्धनाथ सावंत, करमाळा तालुका सचिव हर्षवर्धन गाडे, रमेश हणमंते, उत्तम फड, उषाताई भालेराव, प्रतिक्षा पिटले, आबासाहेब झिंजारे, सुरज मद्देवाद आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रेम ही भावनाच हृदयापासून उत्पन्न होते व हृदयापर्यंत पोहोचते मग ते आईचे प्रेम असो, भावाचे प्रेम असो, किंवा प्रेयसीचे प्रेम असो. जे चिरकाळ टिकते तेच प्रेम असते. अशा आशयाचा “तू ही मेरी जान” (love story) हा हिंदी चित्रपट (short movi) लहान थोर व प्रौढ व वृद्धांनी पहावा असाच आहे.
मेन हिरोच्या भूमिकेत संजय कुमार असून पंडितजीच्या भूमिकेत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष व सुवर्णयुगचे मुख्य संपादक लहूकुमार शिंदे आहेत. मेन व्हीलन (राखा) च्या भूमिकेत विजयकुमार आहेत.
लहूकुमार शिंदे यांच्या पंडितजी च्या भूमिकेमुळे पत्रकार काकासाहेब घुटे, मासूम खान, ॲड अरविंद रेड्डी, दिनेश कांबळे, अविनाश पिटले संजय इटकर आदी मित्र परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

416 Views
बातमी शेअर करा