KINWATTODAYSNEWS

धर्माबाद ग्रामीण रुग्णालय येथे जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.11.जिल्यातील धर्माबाद येथे जागतिक महायुध्दात जखमींवर रात्रीच्या अंधारात हातात दिवा घेऊन उपचार करणाऱ्या जगातील पहिल्या परिचारिका फ्लोरेन्स नाईटिंगेल यांची जयंती जागतिक परिचारिका दिन म्हणून धर्माबादेतील ग्रामीण रूग्णालयात साजरी करण्यात आली.यावेळी सर्व परिचारिकांनी त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून रूग्णसेवेचा व्रत घेण्याची शपथ घेतली.अध्यक्षस्थानी धर्माबाद ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.वेणुगोपाल पंडीत प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.प्रवीण कांबळे डॉ.सारडा होते. रुग्णालयातील अधिपरिचारिका यांनी केले. फ्लोरेन्स नाईटिंगल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण,दीप प्रज्ज्वलित करून व केक कापून जन्मदिवस साजरा करण्यात आला.डॉ.वेणुगोपाल पंडित यांनी उपस्थित सर्व सिस्टर यांना एक-एक गुलाब पुष्प देवून त्यांचा सत्कार केला.अल्पोहाराचा कार्यक्रम आटोपून कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी सौ.महामुनी सिस्टर,सौ.सूर्यवंशी सिस्टर,सौ.कुलकर्णी,सौ. किनवाड सिस्टर,सौ.यामुलवार सिस्टर,गायकवाड सिस्टर, वाघमारे सिस्टर, सोमठाणे सिस्टर,धावणे सिस्टर,कु.दवने सिस्टर,विकास आगळे,नितीन आडे,बालाजी चव्हाण,निलेश जाधव,सुरेश टक्कनवार,नरसिंग गोंविदलवार,राम बोईनवाड, विलास साबणे कर्मचारी व प्रशिक्षणार्थी परीचारीका विद्यार्थ्यांनी सह रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.

369 Views
बातमी शेअर करा