KINWATTODAYSNEWS

गोदावरी अबर्नच्या ” सहकारसूर्य ” मुख्यालयाच्या उदघाटनाची जय्यत तयारी वातानुकूलित मंडप , ५ हजार आसनव्यवस्था

नांदेड / : गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को-ऑप सोसायटीच्या ” सहकारसूर्य ” मुख्यालयाचा उदघाटन सोहळा दि.14 मे 2022 रोजी नांदेड येथे मोठ्या थाटामाटात होणार असून या सोहळ्याची नियोजनबद्ध जय्यत तयारी झाली आहे.उन्हाळ्याचा वाढता त्रास पाहता कार्यक्रमासाठी 5 हजार लोक बसतील अश्या वातानुकूलित मंडपाचे नियोजन करण्यात आले असून भगीरथ नगर येथे 1 हजार चारचाकी वाहने थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री मा. श्री.शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते ” सहकारसूर्य ” मुख्यालयाचे उदघाटन होणार असून या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब , केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. ना. श्री . नितीनजी गडकरी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. उदघाटन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गोदावरी अर्बनच्या अध्यक्षा सौ. राजश्री हेमंत पाटील यांनी केले.
गोदावरी अर्बनने अत्यंत कमी कालावधीमध्ये सहकार क्षेत्रात आपल्या कार्यातून नावलौकिक आणि ग्राहकांचा विश्वास संपादन केला असून त्याच विश्वासाला पुढे नेण्यासाठी गोदावरी अर्बनने आपला कार्यविस्तार वाढविला असून सभासद ,ग्राहकांना अधिकाधिक दर्जेदार सुविधा देण्यासाठी अत्याधुनिक सोयी सुविधांसह गोदावरी अर्बन सज्ज झाली असून त्याच दिशेचे पाऊल म्हणजेच ” सहकारसूर्य ” या अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज असलेले मुख्यालय होय. याच मुख्यालयाचा उदघाटन सोहळा दि.14 मे 2022 रोजी सकाळी 9 वाजता तरोडा नाका , पूर्णा रोड नांदेड येथे मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संपन्न होणार आहे .या भव्यदिव्य सोहळ्याला सर्वच क्षेत्रातील मान्यवर दिगज्ज मंडळी उपस्थित राहणार आहेत. सहकार सूर्य हे मुख्यालय हे खऱ्या अर्थाने नांदेडच्या वैभवात भर टाकणारे आहे . उन्हाळ्याचा वाढता त्रास पाहता कार्यक्रमासाठी 5 हजार लोक बसतील अश्या वातानुकूलित मंडपाचे नियोजन करण्यात आले असून भगीरथ नगर येथे 1 हजार चारचाकी वाहने थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.कार्यक्रमाच्या निमित्ताने सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी राज्यातील विविध पतसंस्थांचे अध्यक्ष तसेच संचालक उपस्थित राहणार आहेत . यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर , महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑप सोसायटीचे अध्यक्ष सुरेश वाबळे, भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे सचिव देविदास तुळजापूरकर हे सामान्यांसाठी सहकारी चळवळीची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.सोबतच सहकार क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गोदावरी अर्बनच्या अध्यक्षा सौ.राजश्री हेमंत पाटील आणि व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी केले आहे.

62 Views
बातमी शेअर करा