*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.11.जिल्ह्यातील विविध तालुक्यात आवश्यकतेनुसार मुख्य लेखा शिर्ष अंतर्गत महसूल अधिकारी, कर्मचार्यांसाठी निवास्थान तर मंडळ व तलाठी कार्यालयांच्या इमारतीस पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यासाठी करोडोचा निधी मंजूर झाला आहे.कोरोना काळातही विकासाला ब्रेक लागणार नाही यासाठीचे प्रयत्न तर कोरोना नंतर तर आता होणारी कामे पाहता विकासाने आणखी स्पीड घेतल्याचे दिसून येत आहे.विकासाचा हा धुमधडाका पाहता विकासकामात नांदेड अव्व्ल असेल असा विश्वास नांदेडकरांतून व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील विविध तालुक्यात महसूल अधिकारी,कर्मचार्यांसाठी निवास्थान तर मंडळ व तलाठी कार्यालयांच्या इमारतीचा प्रश्न होता. काही इमारती जुन्या झाल्याने नवीन बांधकाम तर काही ठिकाणी इमारतींची आवश्यकता होती या बाबीकडे पालकमंत्री चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात आले होते.याप्रकरणी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी याबाबत बेठक घेत आढावा घेतला यानंतर आवश्यकतेनुसार जिल्ह्यातील विविध तालुक्यात अधिकारी,कर्मचार्यांसाठी निवास्थान तर मंडळ व तलाठी कार्यालयांच्या इमारतीसाठी प्रयत्न केले.या प्रयत्नास यश आले असून प्रशासकीय मान्यता व यासाठी करोडोचा निधी मंजूर झाला आहे.
यात जिल्ह्यातील मुदखेड येथे महसूल अधिकारी व कर्मचारी यांचे निवासस्थान,दोन मंडळ कार्यालय व पाच तलाठी कार्यालये,बिलोली येथे अधिकाऱ्यांसाठी दोन निवासस्थान,धर्माबाद येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान,देगलूर येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान,माहूर येथे चार मंडळ अधिकारी कार्यालय व 20 तलाठी कार्यालय,हदगाव येथे 8 मंडळ अधिकारी व 46 तलाठी कार्यालय,हिमायतनगर येथे महसूल अधिकाऱ्यांचे निवासस्थान,लोहा येथे 20 तलाठी कार्यालय, व निवासस्थान,तसेच देगलूर तहसील कार्यालयाच्या सुधारित कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आता महसूल अधिकारी,कर्मचारी यांच्या शासकीय निवासांचा प्रश्न व मंडळ अधिकारी कार्यालय व तलाठी कार्यालयाच्या इमारतीचा प्रश्न ना.अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून मार्गी लागला आहे.
दरम्यान महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून शहरासह जिल्ह्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी प्रयत्न केले यातून विविध विकास कामांसाठी करोडोचा निधी नांदेड जिल्ह्यास मिळाला यातून सिंचन,आरोग्य,रस्ते यासह सर्वच क्षेत्रातील विकासकामे करण्यात आली.अनेक कामे पूर्ण झाली काही प्रगतीपथावर आहेत तर जी कामे प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे आहेत. त्या कामास प्रशासकीय मान्यता व निधी मंजूर करून घेण्यासाठी ना.चव्हाण यांचे प्रयत्न सुरूच आहेत.
कोरोना काळात राज्यात सर्वत्र सर्वाधिक निधी आरोग्यसेवेसाठी खर्च करण्यात आला त्यावेळी नांदेडच्या आरोग्य विभागास बळकटी मिळावी यासाठी करोडोचा निधी मंजूर करून आणला यातून आरोग्यक्षेत्रांशी संबधित कामे करण्यात आली यातून नांदेडकरांना चांगली आरोग्यसुविधा मिळणार आहे.
यासमवेतच अन्य विकासकामें. विविध शासकीय कार्यालये मंजूर करून घेतली त्याकाळातही विकासास खंड पडणार नाही याची पुरेपूर काळजी ना चव्हाण यांनी घेतली होती.आता कोरोना कमी झाल्यानंतर तर विकासाने आणखी स्पीड घेतल्याचे दिसून येत आहे. विकासाचा हा धुमधडाका पाहता विकासकामात नांदेड अव्व्ल असेल असा विश्वास नांदेडकरांतून व्यक्त करण्यात येत आहे.