पनवेल : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पनवेल तालुका महिला पत्रकार यांनी महाबळेश्वर येथे दोन दिवसाच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन नुकतेच केले होते. पत्रकारिता करीत असताना सततच्या बातम्या व्यतेरिक्त वेगळे काही जाणून घेण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष संतोष आमले याच्या मार्गदर्शनाखाली महिला पत्रकार यांनी अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते. सदर अभ्यास दौऱ्यात महाबळेश्वर ठिकाण निवडण्यात आले होते. या ठिकाणी इतिहासातील माहिती मिळविण्याकरिता प्रतापगड येथे भेट देऊन इतिहासातील महत्वाची माहिती महिला पत्रकारांनी घेतली. काही अंतरावर असलेल्या पुस्तकाच्या गावाला भेट देत विविध प्रकारचे कथासंग्रह, कवितासंग्रह, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रेरणादायी, अनेक महापुरुषांचे जीवनकार्य, क्रांतीकारकारकाचे जीवनकार्य असे विविध प्रकारचे पुस्तके पाहिली व काही पुस्तके नजरेखालून घातली गेली. तसेच जगप्रसिद्ध स्ट्रॉबेरीची शेती कशी करतात? याची माहिती घेऊन अनेक विषयावर अभ्यास करण्यात आला. या अभ्यास दौऱ्यात खूप काही शिकायला मिळाले असे महिला पत्रकार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या अभ्यास दौऱ्यामध्ये प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष संतोष आमले, पनवेल तालुका महिला अध्यक्षा पत्रकार शाहीन शेख, पत्रकार आशा घालमे, पत्रकार पूनम शिवशरण, पत्रकार निशा माने आदी पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या अभ्यास दौऱ्याबद्दल संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य, विभागीय, जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी पनवेलच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पनवेल तालुका महिला पत्रकारांचा अभ्यास दौरा संपन्न
51 Views