KINWATTODAYSNEWS

मनोज आव्हाडच्या मारेकर्याना फाशिची शिक्षा द्या! -वसंत जोगदंड

दि.२८/०४/२०२२ रोजी दुपारी ठीक २ वाजता रिसोड येथे लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघा व मानवहीत लोकशाही पक्षाचे वतीने रिसोडचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी साहेब ह्यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्ववरावजी ठाकरे याना श्री वसंतराव जोगदंड सर हराळ उपाध्यक्ष लसाकम तथा विदर्भ अध्यक्ष मानवहीत लोकशाही पक्ष कर्मचारी आघाडी ह्यांचे नेतृत्वात निषेध निवेदन देण्यात आले.निवेदनामध्ये म्हटले आहे की, औरंगाबाद येथील मनोज आव्हाड ह्या मातंग समाजाचे तरुणांला हात पाय बांधुन १०ते११ गुड प्रवृत्तीच्या लोकांनी जिवंतपणी लाठ्या काठ्या,फावड्याचे दांड्यानी मारहाण करुन कृरपणे निर्दयी खुन करण्यात आला ही घटना सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी व समजा समाजामध्ये तेढ निर्माण करणारी ,मानवतेला काळीमा फासणारी होय.मनोज आव्हाडचे जे मारेकरी आहेत त्यांना शासनाने सिफारस करुन फाशिची शिक्षा द्यावी, तसेच मनोज आव्हाड चे कुटुंबाला पोलिस संरक्षण द्यावे, त्याचप्रमाणे कुटुंबाचे पुनर्वसनासाठी मनोज आव्हाड च्या पत्नीला महानगर पालिकेत कायम नोकरी द्यावी,सदर कुटुंबाला शासनाने पुनर्वसनासाठी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत करावी.अश्याप्रकारच्या मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे.सदर निवेदनावर श्री.वसंतराव जोगदंड,आनंदराव ताकतोडे, रामकृष्ण अंभोरे,प्रमोदभाऊ अंभोरे,महीपती इंगळे, शहराध्यक्ष मानवहीत लोकशाही पक्ष,भारत अंभोरे विदर्भ संघटक मानवहीत लोकशाही पक्ष, संजयभाऊ अंभोरे मानवी हक्क अभियान, संदीप झेंडे, यादवराव पारवे से.नि .नायब तहसीलदार,संजय कांबळे, वामनराव अरसड,एम.टी.काबळे उपाध्यक्ष लसाकम रिसोड, लक्ष्मण गायकवाड, विनोद इंगळे, शिवाजी खडसे आदी मातंग समाजाचे सर्व पक्षीय कार्यकर्ते,मानवहीत लोकशाही पक्षाचे कार्यकर्ते कर्मचारी, लहूजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाचे कर्मचारी कार्यकर्ते व बहुसंख्य समाज बांधवांचे उपस्थितीत निषेध निवेदन देण्यात आले.व लवकरच रिसोड तालुक्यातील सकल समाज बांधवांचे उपस्थितीत भव्य दिव्य निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याचे प्रतिपादन आमचे प्रतीनीधीला श्री वसंतराव जोगदंड सर हराळ उपाध्यक्ष लसाकम तथा विदर्भ अध्यक्ष मानवहीत लोकशाही कर्मचारी आघाडी ह्यांनी सांगितले.

83 Views
बातमी शेअर करा