ता. प्र. किनवट :-किनवट शहरात वाळुंचे दळण -वळण करण्यासाठी गाढवांचा सर्रार्स वापर केल्या जात आहे परंतु काम झाल्यावर. त्यांना रस्त्यावर मोकाट सोडुन दिले जातात यांचाच नाहक त्रास किनवट येथील वयोवृध्द महिला , बालके, शालेय विद्यार्थी यांना या होत आहे. काल नुकतेच दोन दुचाकी वाहक जात असतांना दोन गाढव सुसाट पळत अचानक समोर आल्याने खाली पडले व त्या दोघांनाही मुक्का मार लागला. अशा प्रकारे जर नाजुक जागी मार लागल्यास नागरीकास जीवस मुकावे लागेल. याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरीक करीत आहेत.
तरी प्रशासनाने अशा प्रकारे मोकाट गाढव सोडणाऱ्या मालकावर कठोर कार्यवाही करून मोकाट गाढवांना कोंडवाडयात डांबुन योग्य ती कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते व प्रेस संपादक सेवा संघाचे ता.उपाध्यक्ष राजेश पाटील व (टिपुसुलतान ब्रिगेड जिल्हाध्यक्ष व प्रेस संपादक सेवासंघाचे ता.कार्याध्यक्ष )सय्यद नदीम यांनी नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत दुधारे यांना दिले आहे व एक प्रतिलिप मा.तहसिलदार कार्यालय किनवट यांना सादर केले आहे.
वेळोवेळी निवेदन व तोंडी सांगूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. मात्र या वेळेस प्रशासन काय निर्णय घेतात याकडे सर्व नगरवासी यांचे लक्ष लागून आहे.
मोकाट गाढवांना कोंडवाड्यात टाकणे व उचित कार्यवाहीसाठी मुख्याधिकारी नगर परिषद कार्यालय व तहसीलदार यांना निवेदन
210 Views