KINWATTODAYSNEWS

दिव्यांग व्यक्तींच्या मदतीसाठी आता महा-शरद संकेतस्थळ

नांदेड (जिमाका), दि. 6 :- दिव्यांग व्यक्तींना जीवन जगणे सुलभ व्हावे व त्यांना सुगम्यता प्राप्त व्हावी यासाठी विविध सहायक उपकरणाची आवश्यकता असते. या उपकरणामुळे ते त्यांच्या दिव्यांगत्वावर मात करून सर्वसामान्याप्रमाणे जीवन जगतात. यासाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्ती, सामाजिक संघटना त्यांना मदत करू इच्छितात. ही मदत गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहचावी या उद्देशाने सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग, दिव्यांग कल्याण आयुक्तालय व राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत महा-शरद हे वेब पोर्टल सुरू करण्यात आले. दिव्यांग व्यक्तींना सहाय्य करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी www.mahasharad.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

याकरिता दिव्यांग व्यक्तींकडे केंद्र शासनाच्या वैश्विक ओळखपत्र प्रणालीअंतर्गत प्रमाणित असणे आवश्यक आहे. जी व्यक्ती आणि सामाजिक सेवाभावी संस्थांकडून या प्रणालीद्वारे मदत करतील त्यांना आयकरात 80-जी अंतर्गत सूट राहिल. या प्रणालीत जास्तीत-जास्त दिव्यांग व दानशूर व्यक्ती आणि सामाजिक सेवाभावी संस्थांनी www.mahasharad.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असेही आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

000000

140 Views
बातमी शेअर करा