*किनवट :* कार्यकारी अभियंता यांच्या विज बिल वसुलीसाठी चालू असलेल्या प्रचंड दबावामुळे व मे महीन्यात प्रचंड तापमान असतांनाही महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्देशानूसार घेण्यात येणाऱ्या काळजी ऐवजी कार्यकारी अभियंता यांनी तांत्रिक कर्मचाऱ्यांना दबाव तंत्राचा वापर करून सकाळी साडेसात ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत वसुली करण्याचे तोंडी आदेश दिल्यामुळे तालुक्यातील विज कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झााले आहेे.यामुळे महावितरणचे तांत्रिक कर्मचारी हे लवकरच पंधरा दिवसाच्या सामुहिक रजेवर जाणार आहेत.
विज कर्मचाऱ्यांकडे केवळ विज बिल वसुलीचे काम नसून विज वाहीणी देखभाल दुरुस्ती चे काम देखील २४ तास पहाण्याची जबाबदारी आहे. ऐन उन्हाळ्यातील तापमानाच्या उखाड्यामुळे व वाढलेल्या विजेच्या मागणीमुळे विज वाहीण्यावर व रोहीत्रांवर प्रचंड लोड वाढल्यामुळे वारंवार विज पुरवठा खंडीत होणे,वायर तुटने या घटना वाढल्यामुळे विज ग्राहकांना अखंडित विजपुरवठ्या ची सेवा देण्यासाठी अगोदरच अपुऱ्या असणाऱ्या विज कर्मचाऱ्यांना प्रचंड प्रमाणात धावपळ करावी लागत आहे.
त्यातच कार्यकारी अभियंता यांचे तुगलकी आदेश सकाळी साडेसात पासून रात्री साडेआठ पर्यंत केवळ विजबिल वसुली करण्याचे आदश व सदर वसुलीचे काम दिलेल्या उदिष्टापर्यंत न झाल्यास शिस्तभंगाची,पगार कपातीची निलंबनाची व बदलीची कार्यवाही अशा गंभीर स्वरुपाच्या कार्यवाह्या करण्याची वारंवार ताकीद दिल्या जात आहे.
यामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा तान व तनावामुळे कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण होत आहे.
त्यामुळे कर्मचाऱ्यांची विज दुरुस्ती व देखभाल करण्याच्या कामावेळी मनस्थिती बिघडून अपघात ही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व प्रकारात पार्श्वभूमीवर कंटाळून तालुक्यातील महावितरणचे तांत्रिक कर्मचारी हे पंधरा दिवसांच्या सामुहिक रजेवर लवकरच जाणार असल्याचे कळाले.
वरीष्ठ अधिका-यांच्या आदेशाला कंटाळून महावितरणचे कर्मचारी जाणार सामुहिक रजेवर
255 Views