किनवट = (ता.प्रतिनिधी) जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांची ९१७ वी जयंती आज (३ मे) शहरातील बसवेश्वर चौकात भक्तांनी उत्साहात साजरी केली. बसवेश्वरांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी पुतळा उभारावा अशी अपेक्षा जेष्ठ समाजसेवक शिवराज राघूमामा यांनी नगराध्यक्षांच्या उपस्थितीत व्यक्त केली. यावर नगराध्यक्ष मच्चेवार यांनी सभागृहात सदरची मागणी मांडणार असल्याचे आश्वासन दिल्याने उपस्थितांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
बसवेश्वरांच्या जयंती सोहळ्या समयी भाजपचे जेष्ठनेते तथा समाजसेवक शिवराज राघूमामा, विश्वनाथअप्पा भंडारे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांचे हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. म.बसवेश्वरांच्या जीवनावर प्रकाश टाकतांना राघूमामा यांनी आपले मत मांडले आणि पुतळा उभारावा अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावेळी नगराध्यक्ष आनंद मच्चेवार यांनी नगरपरिषदेत सदरची मागणी मांडण्यात येईल अशी ग्वाही दिली. त्यामुळे भक्तांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
कार्यक्रमास नगरसेवक अजय चाडावार, नागनाथअप्पा भंडारे, गणपतअप्पा भंडारे, बाळूअप्पा व्यवहारे, अरुणअप्पा भंडारे, सतिषअप्पा बिराजदार, चंद्रकांतअप्पा भंडारे, अनिलअप्पा भंडारे, पत्रकार आनंद भालेराव, कुष्णा कलकुंटवार, माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, संदिप निखाते, सामनगावेअप्पा, वड्डेअप्पा, महेशअप्पा बिराजदार, डॉ.प्रसाद सुर्वे, संतोष ठोंबरे, महेश भंडारे, विजय महाजन, विनायक ठोंबरे, गजू शिवनकर इत्यादींची उपस्थिती होती.
जगतज्योती महात्मा बस्वेश्वर जयंती मोठ्या उत्सवात साजरी
124 Views