KINWATTODAYSNEWS

इस्लापुर वनपरिक्षेत्र अधिकारी पी.के. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैद्य फर्निचर इस्लापूर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पकडण्यात यश

इस्लापुर(प्रतिनिधी):
दिनांक 26 मे 2021रोजी किनवट वरून नांदेड ला जाणाऱ्या अवैद्य फर्निचर इस्लापूर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पकडण्यात यश प्राप्त झाले आहे. सदरचे फर्निचर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले आहे.
सविस्तर असे की, किनवट करून इस्लापूर मार्गे नांदेड ला टाटा इंडिका गाडी नंबर (ए पी.28 बी पी.28 94 59 )मध्ये सागवन फर्निचर जात असल्याची गुप्तवार्ता इस्लापूर परिक्षेत्र कार्यालयाला मिळाली असता इस्लापुर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी पी.के. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल यु यु मोकले यांनी आपल्या टीमसह रस्त्यावर गाडीची वाट पाहत थांबले असता समोरून येणाऱ्या इंडिका गाडीच्या ड्रायव्हरने वनविभागाची गाडी पाहून आपली गाडी परत दिशेला वळविली पळून जाण्याचा प्रयत्न केला. विभागाच्या पथकाने सिनेस्टाईल त्यांचा पाठलाग करत असताना तस्कर आपली गाडी सोडून पळून गेले. त्या गाडीत जवळ जवळ 0.102 घन मिटर एवढे सागी फर्निचर होते. ज्याची अंदाजे किंमत गाडी सहा रुपये 40 हजार होती. सदरची तस्करी रोखण्यासाठी वन विभागाचे वनरक्षक कृष्णा घायाळ, कृष्णा जाधव, शिंगणे, वाघमारे, वन मजूर श्रीरामे, वाहन चालक डीबी दूरपुडे यांनी आपली कामगिरी पार पाडली. सदरील घटनेचा तपास वनपाल ए. आर.देशमुख जलधरा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

306 Views
बातमी शेअर करा