किनवट : महाराष्ट्र दिन हा १ मे रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्याची निर्मिती झालेली आहे. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.
किनवट शहरातील गोकुंदा भागातील संत तुकाराम निवासी अपंग कर्मशाळा येथे महाराष्ट्र दिन हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण करून महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहन हे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष तथा माहिती अधिकार महासंघाचे कार्याध्यक्ष आशिष शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहण नंतर तिरंगी ध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत गाऊन ध्वजाला मानवंदना देण्यात आली. शेवटी अपंग कर्मशाळा येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी संत तुकाराम महाराज निवासी अपंग कर्मशाळेचे कर्मचारी तसेच बाळासाहेब मारोतराव अस्वले, गंगाधर सोमवारे, अशोक ढगे व गृहपाल परविण शेख आणि शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.
संत तुकाराम निवासी अपंग कर्मशाळा येथे महाराष्ट्र दिन साजरा ; आशिष शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहण
424 Views