KINWATTODAYSNEWS

पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन

किनवट ता.प्र.: प्रदीर्घ 18 वर्षापासून राज्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटना राज्य शासनासोबत वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलने, उपोषणे, धरने, बैठा सत्याग्रह, च्या माध्यमातून अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी लढा देत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तत्कालिन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, यांच्या सरकारमध्ये दहा टक्के राखीव आणि वयाच्या मर्यादित 55 वर्षापर्यंत सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. परंतु सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचारी हे वयाची 50 ,51 वर्ष आज रोजी पार केली असल्याने या दहा टक्के आरक्षणाचा फारसा फायदा होताना दिसत नसल्याने कर्मचारी संघटना आक्रमक होऊन थेट नियुक्ती च्या विषयी आग्रह धरला आहे. आमचे समकालीन असलेले हजेरी सहाय्यक, मतदार नोंदणी सहाय्यक, सह इतर संघटनेच्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात आले आहे. परंतु अंशकालीन कर्मचारी मात्र अद्यापही शासकीय से पासून वंचित च राहिला आहे. ही बाब राज्य संघटनेचे अनिल पाटील कोल्हापूर यांनी ठाकरे सरकारच्या निदर्शनास आणून दिल्याने ठाकरे सरकार सकारात्मकता दर्शवून प्रशासकीय स्तरावरील प्रक्रिया ही गतीने काम करीत अंतिम टप्प्यात आली असल्याचे अनिल पाटील व मुंबई टीम यांनी कळविले आहे. आणि याच संदर्भात अतिशय महत्त्वाची बैठकीचे आयोजन दिनांक 6 मे रोजी अकरा वाजता कामगार कल्याण केंद्र शिवाजी पुतळ्याजवळ सिडको येथे केले आहे. तेव्हा नांदेड जिल्ह्यातील तमाम पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांनी या महत्त्वपूर्ण बैठकीला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष नवघरे, परमेश्वर कार्लेकर, संजय भंडारे, प्रीती मुनेश्वर, अनिल पैइत्वर, अजमत पटेल, असलम चव्हाण, दिलीप पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

2,550 Views
बातमी शेअर करा