*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.29.इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पशु वैद्यकीय दवाखाना येथील झुडुपांमध्ये एका २३ वर्षीय युवकाचा अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्रांच्या साहाय्याने खून केल्याचा प्रकार रात्री १२ वाजता उघडकीस आला.इतवारा पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
श्याम प्रभू साबणे रा.शिवनगर इतवारा नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते आई वडील,बहीण भाऊ असे सर्व जण एकत्र राहतात.रेल्वे स्थानकावर विविध कामे करून आपले जीवन चालवतात.२९ एप्रिल २०२२ रोजी ते सकाळी कामावर जाण्याच्या तयारीत असतांना भाऊ अमोल साबणे (२३) हा नैसर्गिक विधी साठी पशु वैद्यकीय दवाखान्यातील झुडुपांमध्ये गेला.मी कामावर गेलो.रात्री १० वाजता मी घरी आलो. घरी विचारणा केली की,अमोल कामावर का आला नाही तेव्हा मला सांगण्यात आले की,तो सकाळी नैसर्गिक विधी साठी गेला आणि अद्याप परत आलाच नाही.तेव्हा मी आणि माझे अनेक मित्र घरी न आलेला भाऊ अमोल प्रभू साबणे (२३) यास शोधण्यासाठी निघालो.मोबाईलच्या बॅटरी उजेडात आम्ही अमोलचा शोध घेतला तेव्हा त्याचे प्रेत पशु वैद्यकीय दवाखान्याच्या झाडा झुडुपांमध्ये पडलेले हॊते.त्याच्या गालावर,छातीवर,दंडांवर, पोटावर बेंबीजवळ, धारदार शस्त्रांनी अनेक जखमा केलेल्या दिसल्या.आम्ही इतवारा पोलिसांना याबाबत माहिती दिली.तेव्हा पोलीस आले.
माझा भाऊ अमोल प्रभू साबणे (२३) यास कोणीतरी २९ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजे दरम्यान मारून जखमी करून खून केला आहे.इतवारा पोलिसांनी या बाबत अज्ञात मारेकऱ्यांनी अज्ञात कारणांसाठी अमोल साबणेचा खून केला असा स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे.पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक शेख असद यांच्याकडे तपास देण्यात आला आहे.
*खासदार साहेब अजून एक खून वाढला*
नांदेड जिल्ह्यात जानेवारी पासून २५ खून झाले आहेत.म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडली आहे.असे वक्तव्य खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते.आता पुन्हा एक नवीन खून झाला आहे.एक संख्या वाढली आहे.म्हणजे पशु वैद्यकीय दवाखान्यात पोलीस ठेवायला हवे असे वाटते.पण कोठे कधी खून होणार याला जाणण्याचे गणित अद्याप विकसित झालेले नाही.नाहीतर पोलीस विभागाने नक्कीच केले असते.माजी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या कार्यकाळात सुद्धा एव्हडेच खून झाल्याचा अभिलेख उपलब्ध आहेच.अवघड आहे ना खासदार साहेब